Nashik Crime: भोंदू खरातच्या ऑफिसबॉयला अटक, कार्यालयातलं सीसीटीव्ही फुटेज लीक करत फोडलेलं बिंग

Why Was Neeraj Jadhav Arrested?: नाशिकमध्ये स्वयंघोषित अंकज्योतिषी अशोक खरात प्रकरणात मोठे उघड झाले असून ‘एसआयटी’कडून कसून चौकशी सुरू आहे.
Nashik Crime

Nashik Crime

esakal

Updated on

नाशिक: स्वयंघोषित अंकज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्याभोवती विशेष तपास पथकाने (एसआयटी) फास आवळला असून त्याची आज आठ तासांपेक्षा अधिक काळ कसून चौकशी करण्यात आली. खरातच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज उघड करीत त्यांचे बिंग फोडणाऱ्या ऑफिसबॉय नीरज जाधव याला शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे.

खरातने तांत्रिक विधीच्या नावाखाली शेकडो महिलांचे शोषण केले असून त्याच्याही काही क्लिप उघड झाल्या आहेत. खरात हा चौकशी प्रक्रियेदरम्यान पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com