

Navi Mumbai Crime
ESakal
नवी मुंबई : नवीन पनवेल भागात राहणाऱ्या एका तरुणाने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने पीडित मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आला. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी खांदेश्वर पोलिसांकडे वर्ग केला आहे.