

Gram Sevak Caught Accepting Bribe in Palghar
निखिल मेस्त्री
पालघर : पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक राजेश पंढरीनाथ संखे याला वीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका कृषी पर्यटन केंद्राला ना हरकत दाखला देण्यासाठी संखे याने पैशांची मागणी केली होती. पालघरच्या लाचलूचपत विभागाने कारवाई केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.