Chandrapur: शाळेपासूनचं प्रेम, लग्नानंतरही संपर्कात; इतरांशी संबंधाचा संशय, प्रियकरानं विवाहित प्रेयसीला संपवलं

Police Solve Rajura Murder Case Within 24 Hours: राजुरा येथील महिलेच्या हत्येचे गूढ अवघ्या २४ तासांत उलगडले. अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून हत्या झाल्याचे तपासात समोर आले असून तेलंगणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

राजुरा: वेकोलिच्या धोपटाळा वसाहतीत एका महिलेच्या हत्येचे गूढ अवघ्या चोवीस तासांत उलगडले. या महिलेचा खून अनैतिक संबंधांच्या कारणातून झाल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणात तेलंगणातील मंचेरियाल येथून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला रात्री उशिरा चंद्रपुरात आणण्यात आले. संबंधित महिलेशी त्याचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे. लग्नानंतरही दोघे एकमेकांच्या संपर्कात होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com