Crime News : कुतुबखेडा येथे चोरटयांनी शेतकऱ्याचे हातपाय बांधून केली बेदम मारहाण

अज्ञात चार -पाच चोरट्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना
Crime News
Crime News esakal

पाचोड : पिकाला पाणी देण्यासोबतच सोंगलेल्या बाजरी व कांद्याच्या राखणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचे हात पाय बांधून अज्ञात चार -पाच चोरट्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना कुतूबखेडा (ता.पैठण) येथे मंगळवारी (ता. सात) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.

Crime News
Buldana News : सालई गोंद बी प्रकरणात आरोपी करणार नाही; त्यासाठी 10 हजाराची लाच मागणारा वनपाल अडकला जाळ्यात

यासंबंधी अधिक माहिती अशी, कुतूबखेडा (ता.पैठण) येथील अरुण दामोधर पठाडे (वय ५५) हे पाणीटंचाईने उग्ररूप धारण केल्याने विहीरीला आलेले जेमतेम पाणी पिकांस देण्यासोबत सोंगलेल्या बाजरी व कांद्याच्या राखणीसाठी शेतावर गेले असता मंगळवारी (ता.सात) पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात दहा बारा चोरटे हातात तलवारी, टॉम्या व लोखंडी सळ्या घेऊन शेतात आले व त्यांनी अरुण पठाडे यांच्या मोटार सायकलीचे पेट्रोल काढण्यास सुरुवात केली. अरुण पठाडे यांनी त्यांच्या दिशेने विजेरी (बॅटरी) चमकावून ते आले असता त्यांनी त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली.

Crime News
Nashik Onion News : पिंपळगाल, मालेगाव, नामपूरसह सर्वत्र आवक वाढली; निवडक कांद्याला दोन हजार ते तेवीसशेचा दर

यात अरूण पठाडे याचे डोके फुटले त्यानंतर चोरट्यांनी अरुण पठाडे यांस पकडून बाजरीच्या पेंढ्या बांधण्यासाठी सोबत नेलेल्या सुतळीने दोन्ही हात व पाय बांधून त्यांस बेदम मारहाण करून तेथेच टाकले. चोरटयांनी अरूण पठाडे यांच्या अंगाची झडती घेऊन त्यांच्या हातातील दोन चांदीच्या अंगठ्या,रोख चारशे रुपये व दुचाकीचे प्लग काढून नेले. सकाळी सहा वाजेच्या सुमारास अशोक झिंजुर्डे व बाळासाहेब पठाडे हे शेतात गेले असता त्यांनी अरुण पठाडे यांचे बांधलेले हातपाय मोकळे करून त्यांना पाचोडच्या ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तुर्तास त्याचेवर पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची पाचोड पोलिसाना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला.

Crime News
Jalgaon News : लासूरची ऐतिहासिक ‘साखर बावडी’ वाचविण्याची गरज

संबंधीत चोरटयांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते. एवढेच नव्हे तर सर्वप्रथम या चोरट्यांनी दादेगाव हजारे येथे चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. तेथील दत्तात्रय काकडे यांचे घरासमोर त्यांनी मद्यप्राशन केले. ते चोरीच्या प्रयत्नात असतानाच चोरट्यांचा आवाज ऐकून घराच्या छतावर झोपलेल्या काकडे परिवाराने कोण आहे ? हे विचारताच त्यांनी कुतूबखेडा शिवारात प्रवेश करून धूडगूस घातला.

यासंबंधी पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. यासंबंधी जखमीचा मुलगा आबा पठाडे यांनी पोलिसांच्या गावांत गस्त सुरू करून शेतकऱ्यांना गस्तीच्या रूपाने पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com