आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 ऑक्टोबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Panchang

पंचांग - शनिवार : कार्तिक शुद्ध ४/५, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, चंद्रोदय सकाळी १०.२०, चंद्रास्त रात्री ९.२९, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.०२, कड पंचमी, पांडव पंचमी, ज्ञानपंचमी, (जैन), भारतीय सौर कार्तिक ७ शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 ऑक्टोबर 2022

पंचांग -

शनिवार : कार्तिक शुद्ध ४/५, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, चंद्रोदय सकाळी १०.२०, चंद्रास्त रात्री ९.२९, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.०२, कड पंचमी, पांडव पंचमी, ज्ञानपंचमी, (जैन), भारतीय सौर कार्तिक ७ शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९४ - विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘होमी भाभा पुरस्कार’ डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.

  • १९९६ - मध्य प्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘तानसेन पुरस्कार’साठी शास्त्रीय गायिका गिरिजादेवी यांची निवड.

  • १९९६ - कल्पक्कम येथील स्वदेशात बनविलेली ‘कामिनी’ ही ३० मेगावॉट क्षमतेची अणुभट्टी कार्यान्वित.

  • १९९७ - माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकरत्न पुरस्कार’ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर.

  • २००३ - भारत आणि रशियाने संयुक्तपणे तयार केलेल्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.