२१ दिवसांची 'ती' अजब अट आणि बंद खोली! जगन्नाथ पुरीच्या मूर्ती अपूर्ण राहण्यामागची रंजक कथा जाणून घ्या...

Jagannath Puri Temple: दिवसाच्या कोणत्याही वेळी शिखराची सावली न पडणारा कलिंग शैलीचा अद्भूत नमुना; वाचा ९०० वर्षांचा इतिहास आणि मूर्तींचे रहस्य!
Why Are Jagannath Idols Incomplete?

Why Are Jagannath Idols Incomplete?

esakal 

Updated on

Why Are Jagannath Idols Incomplete?: चार धामांपैकी एक असलेल्या ओडिशामधील जगन्नाथ पुरी मंदिराला 'धरतीचे वैकुंठ' म्हटले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू जेव्हा चार धामांच्या यात्रेवर जातात, तेव्हा ते बद्रीनाथमध्ये स्नान करतात, द्वारकेत वस्त्र परिधान करतात, रामेश्वरममध्ये विश्राम करतात आणि पुरीमध्ये भोजन करतात. द्वापर युगानंतर भगवान श्रीकृष्ण पुरीमध्ये 'जगन्नाथ' म्हणजेच जगाचे नाथ म्हणून निवास करू लागले. या मंदिरात भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत विराजमान आहेत. या मंदिराचा पौराणिक इतिहास आणि येथील मूर्तींच्या निर्मितीची कथा अत्यंत रंजक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com