Kumbh Mela 2025 : विविध देशांचे प्रतिनिधी मंडळ आज करणार पवित्र स्नान
Triveni Sangam : कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्राच्या वतीने विविध देशांच्या २१ प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये १० देशांचा समावेश असून, या प्रतिनिधीमंडळाचे पवित्र स्नान गुरुवारी, १६ जानेवारी रोजी त्रिवेणी संगमावर होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आणि त्रिवेणी संगमावरील पवित्र स्नानासाठी केंद्राच्या वतीने विविध देशांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले .