Tourism | तब्बल 2500 वर्षे जुने रुक्मिणी देवी मंदिर ! जाणून घ्या

भारतात राधाकृष्णाची अनेक मंदिरे (Radha-krishna Temple) आहेत. परंतु रुक्मिणीदेवीचे मात्र एकच मंदिर आहे
Rukmini devi Temple, Dwarka
Rukmini devi Temple, Dwarka esakal

रुक्मिणीदेवी (Rukminidevi) ही भगवान कृष्णाची (Shrikrishna) पहिली पत्नी (wife) होय. प्रेम (Love) आणि पावित्र्याचे प्रतीक म्हणजे रुक्मिणी देवी होय. त्यांच्यानंतर जांबवती (Jambavati) आणि सत्यभामा (Satyabhama) या श्रीकृष्णाच्या पत्नी होत्या. रुक्मिणीदेवी या भगवान कृष्णाच्या पहिल्या पत्नी होत्या; परंतु त्याचं नाव नेहमी राधेशी (Radha) जोडले गेले. त्यामुळे भारतात राधाकृष्णाची अनेक मंदिरे (Radha-krishna Temple) आहेत. परंतु रुक्मिणीदेवीचे मात्र एकच मंदिर आहे आणि ते द्वारकेत (Dwaraka) आहे.

Rukmini devi Temple, Dwarka
भगवत गीतेतील उपदेशातून मिळेल जगण्याचा मंत्र

मंदिर कुठे आहे? (Where is the temple?)

द्वारका शहराच्या जवळील द्वारकाधीश मंदिरापासून सुमारे 2 किमी अंतरावर रुक्मिणीदेवीचं मंदिर आहे. हे मंदिर तब्बल २५०० वर्ष जुनं असल्यांचं बोललं जातं. एका लहानशा तळ्याच्या शेजारी हे मंदिर आहे. हे ठिकाण अतिशय सुंदर असून तिथे नेहमीच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. हे ठिकाण अतिशय शांत आहे. या भागात पूर्वी जंगल असल्याचं बोललं जाते.

मंदिराची रचना (The structure of the temple)-

मंदिराला जुने कोरीवकाम असलेलं अतिशय सुंदर शिखर आहे. शिखरावर अतिशय सुंदर प्रकारचं नक्षीकाम आहे. त्यावर स्त्रियांच्या प्रतिमा साकारल्याचंही दिसून येतं. तसेच या शिखरावर भगवान विष्णूच्या काही प्रतिमा आहेत तसचे हत्तींच्या रचनांची रांग असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. या विशिष्ट नागर शैलीतील मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वजही लावला आहे.

Rukmini devi Temple, Dwarka
गीता जयंती 2021 | श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमधून धर्म-कर्माचे ज्ञान दिले

रुक्मिणी आणि राधा (Rukmini and Radha)-

रुक्मिणी हा लक्ष्मीचा (Lakshmi) अवतार आहे आणि त्याचप्रमाणे राधा देखील लक्ष्मीचा अवतार आहे, असे मानले जाते. या दोघी एकत्र दिसल्याचा उल्लेख आढळत नाही. म्हणून, अनेकांचा असा विश्वास आहे की या दोघी एकच आहेत. त्यांचे समान वय आणि भगवान श्रीकृष्णावरील भक्ती लक्षात घेता हे देखील शक्य असल्याचं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com