
दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला आदि शंकराचार्य यांची जयंती साजरी केली जाते. आदि शंकारचार्यांची मुख्य भूमिका हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार करण्याची होती. असं म्हणतात की शंकराचार्य यांना केवळ 8 वर्षाचे असताना वेदांचे ज्ञान प्राप्त झाले होते.
शंकराचार्य यांनी देशातील चार धामाला सनातन परंपरेच्या एक सूत्रात बांधण्यासाठी 4 मठांची स्थापना केली होती. आज आपण या महान आदी शंकराचार्य यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. (Adi Shankaracharya life incidents death reason and how he became a monk)
आदि शंकराचार्य यांचा जन्म 788 इसवी मध्ये केरळच्या मालाबार क्षेत्रातील कालडीमध्ये नम्बूद्री ब्राह्मण शिवगुरु आर्याम्बाच्या घरी झाला होता. आदि शंकराचार्याचे आईवडिलांनी पुत्र प्राप्तीसाठी शिव शंकराची आराधना केली होती. त्यांची इच्छा होती की त्यांच्या पुत्राची महती सर्वत्र पसरावी.
आई वडिलांच्या आराधनेला प्रसन्न होऊन शिवजीने पुत्रप्राप्तीची इच्छा पुर्ण केली मात्र शिवजी म्हणाले की हे पुत्र एक तर यश प्राप्त करू शकणार नाही तर दीघार्यु. आई वडिलांनी सर्वज्ञानी पुत्राची इच्छा व्यक्त केली आणि महाअवतारी युगपुरुषच्या नावाने ओळखले जाणारे आदि शंकराचार्य अल्पायुषी झाले.
असं म्हणतात ती 820 इसवी मध्ये फक्त 32 व्या वर्षी आदि शंकराचार्य यांनी हिमालयात समाधी घेतली. बद्रीनाथ मंदिरचे रावल आज याच वंशाचे ब्राह्मण असतात.
आदि शंकराचार्यांच्या वडिलांचे खूप लवकर निधन झाले. त्यांची आईने वेदांच्या ज्ञानासाठी शंकराचार्य यांना गुरुकुलला पाठविले. आदि शंकराचार्यांनी वयाच्या फक्त आठव्या वर्षी वेद, पुराण, रामायण, उपनिषद्, महाभारतसह सर्व धर्मग्रंथाचे ज्ञान मिळवले होते.
पौराणिक कथेनुसार एकदा आदि शंकराचार्य नदीमध्ये गेले तेव्हा मगरीने त्यांचा पाय पकडला. याच वेळी त्यांनी आपल्या आईला सांगितले, " मला संन्यासी बनायचे आहे आणि जोपर्यंत मला तु आज्ञा देत नाही तो पर्यंत मगर माझा पाय सोडणार नाही." आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आईने आदि शंकाराचार्य यांना संन्यासी बनायची आज्ञा दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.