

Aja Ekadashi 2026: Date, Shubh Muhurat, Puja Vidhi & Vrat Katha
esakal
Restore Lost Wealth and Success: हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष स्थान दिले जाते. यंदा सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ ला अजा एकादशीचे पवित्र व्रत पाळले जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, अजा एकादशीचे व्रत केल्याने साधकाला अश्वमेध यज्ञाचे पुण्य लाभते आणि जन्मोजन्मीची पापे नष्ट होऊन मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. हे व्रत केल्याने माणसाला त्याचे गमावलेले गतवैभव, पद, पैसा, प्रतिष्ठा आणि कौटुंबिक सुख-शांती पुन्हा प्राप्त होते, अशी दृढ धार्मिक श्रद्धा आहे.