
Akhuratha Sankashti Chaturthi 2024: हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खुप महत्व आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातील आणि या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे. याला अखुरथ संकष्टी चतुर्थी देखील म्हणतात. संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पाला समर्पित असते.
यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 डिसेंबरला सकाळी 10:06 वाजता सुरू होईल आणि 19 डिसेंबरला सकाळी 10:02 वाजता समाप्त होईल. तसेच चंद्रोदयाची वेळ रात्री 09:03 आहे. यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता.
संकष्टी चतुर्थीला गणरायाची मनोभावे आणि विधीवत पूजा केली जाते. तसेच अनेक लोक उपवास करतात. या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास आर्थिक समस्या दूर होतात. तसेच नोकरी आणि व्यवसायत प्रगती होते. आजच्या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.