

What is the Best Time or Mahurat to Buy Gold on Akshaya Tritiya 2026 to Attract Prosperity
sakal
Best Time to Buy Gold on Akshaya Tritiya 2026: उन्हाळा सुरु झाला की, आंबे, कैरी, आवळा, चिंच, पन्हं, सरबतं, आईसक्रीम आणि त्यासोबत उत्सुकता असते ती अक्षय्य तृतीयेची. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. हिंदू धर्मात असलेल्या साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया.
संपत्ती, समृद्धी आणि शुभारंभाचं प्रतीक मानला जाणारा हा दिवस खास करून सोनं खरेदीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पण फक्त सोनं खरेदी करणं पुरेसं नसतं, तर योग्य मुहूर्तावर खरेदी केल्यास त्यामुळे मिळणारी शुभ फळ अधिक वाढतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच यंदा अक्षय्य तृतीयेला नेमका कोणता वेळ सर्वात लाभदायक आहे, हे जाणून घेणं अधिक गरजेचं ठरतं.