Amla Navami 2022: आवळा नवमीचे काय आहे महत्त्व आणि पूजा कशी करावी?

आवळा नवमी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरी केले जाते याला अक्षय नवमी देखील म्हणतात.
Amla Navami 2022
Amla Navami 2022Esakal
Updated on

आवळा नवमी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरी केले जाते याला अक्षय नवमी देखील म्हणतात. या दिवशी स्त्रिया आवळ्याच्या झाडाखाली बसून संतान प्राप्ती आणि संतान रक्षेसाठी पूजा करतात. आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करण्याची देखील पारंपरिक परंपरा आहे. या दिवशी स्नान, पूजन, तरपण आणि अन्न इतर दान केल्याने अक्षय फळ प्राप्ती होते असा समज आहे.

पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी ते पौर्णिमा पर्यंत प्रभू विष्णू आवळ्याच्या झाडावर निवास करतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व दान-पुण्य केल्याने अक्षय पुण्य प्राप्ती होते. इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा आवळा नवमीला केलेलं दान अधिक पटीने लाभ प्रदान करणारे ठरत.

Amla Navami 2022
Tulsi Vivah 2022: तुळशीचे लग्न कसे करावे, सोपी पद्धत जाणून घ्या...

आवळा नवमीची पूजा कशी करावी?

या दिवशी सकाळी उठून स्नानादिने निवृत्त होऊन व्रत संकल्प करावा. नंतर आवळ्याच्या झाडाखाली पूर्वाभिमुख होऊन बसून  'ॐ धात्र्ये नम:' मंत्र जपत आवळ्याच्या झाडाच्या मुळात दुधाची धार सोडत पितरांना तरपण करावे.

कापूर आणि तुपाचा दिवा लावून आरती करून प्रदक्षिणा घालावी.आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यावर झाडाला 108 वेळा प्रदक्षिणा घातल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले गेले आहे. पूजा- अर्चना केल्यानंतर खीर, पुडी, भाजी आणि मिठाईचं नैवेद्य देखील दाखवलं जातं. अनेक धर्मप्रेमी आवळा पूजन केल्यावर झाडाच्या सावलीत ब्राह्मण भोजन करवतात.या दिवशी स्त्रिया अक्षता, फुलं, चंदन इतर सामुग्रीने पूजा-अर्चना केल्यावर पिवळा दोरा गुंडाळत झाडाची प्रदक्षिणा घालतात.

Amla Navami 2022
Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहला करा 'हे' सोपे उपाय; वैवाहिक जिवनात नांदेल आपोआप सुख शांती

आता बघू या आवळयाचे धार्मिक महत्त्व...

आवळ्याच्या गुणधर्मामुळे त्याला धार्मिक दृष्ट्या हि फार महत्व आहे. आवळ्याच्या झाडमध्ये निरनिराळ्या देव देवता वास करतात अशी समजूत आहे. या झाडाच्या मुळात विष्णू, खोडात ब्रम्हदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचे वास्तव्य आहे अशी समजूत आहे. त्यामुळे हा वृक्ष विशेष पूजनीय आहे. कार्तिक महिन्यात आवळ्याला बहर येतो म्हणून कार्तिक शुद्ध अष्टमी पासून पौर्णिमे परेंत आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन करतात. भोजना पूर्वी झाडाला श्रीफळ युक्त अर्घ्य देऊन झाडाखाली श्री विष्णूची यथासांग पूजा करतात. काही भागात आवळयाच्या झाडाच्या चारही हि बाजूला तुपाचे दिवे लावतात. आवळ्यावर वात लावून झाडाला ओवाळतात. या सोहळ्याला आवळी भोजन म्हणतात.

Amla Navami 2022
Tulsi Vivah 2022: तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडासोबत का लावलं जातं ?

आवळा नवमीच्या दिवशी काय करावे?

1) आवळा नवमीच्या दिवशी पितरांच्या शीत निवारणासाठी गरजुनां कपडे व ब्लँकेट्स दान करावे.

2) मुलांची स्मरण शक्ती वाढावी किंवा ज्या मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल अशा मुलांच्या पुस्तकात आवळा आणि चिंचेच्या झाडाचे हिरवे पाने ठेवावे.

3) मनोभावे आवळ्याच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालाव्या.आवळ्याच्या झाडाखाली विद्वान ब्राह्मणांना भोजन करवून दक्षिणा द्यावी.

4) स्वत: झाडाखाली बसून भोजन करावे. 

5) आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याचं झाडं घरी किंवा शेतात लावणे शुभ मानले जाते. तसं तर पूर्व दिशेत मोठे झाडं लावू नये परंतू या दिशेत आवळ्याचं झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जेचं प्रवाह वाढतो. तसेच घराच्या उत्तर दिशेला देखील हे झाड लावणे योग्य ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com