Appasaheb Dharmadhikari : अविरत सेवेचा झरा आप्पासाहेब धर्माधिकारी

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४७ रोजी मुंबईमधील गोरेगाव येथे झाला. त्यांचे बालपण, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रेवदंडा या ठिकाणी झाले.
Appasaheb Dharmadhikari
Appasaheb Dharmadhikarisakal

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४७ रोजी मुंबईमधील गोरेगाव येथे झाला. त्यांचे बालपण, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रेवदंडा या ठिकाणी झाले.

धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्रात निरूपण आणि अनेक सेवाभावी उपक्रम हाती घेतले. गोरगरीब जनता अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता यामध्ये अडकलेली आहे. त्यांना मार्गदर्शनवर्गांची आवश्यकता आहे. यासाठीच त्यांनी प्रबोधन सुरू केले. वडिलांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हे समाजसेवेचे काम आपल्या हाती घेतले.

जनतेला आध्यात्मिक ज्ञान देण्याचे काम नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. आपल्या वडिलांनी सुरू केलेले कार्य डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुढे सुरू ठेवले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला समजेल की, त्यांना ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कारा’ने का गौरवण्यात आले असावे.

महाराष्ट्रभूषण निरूपणकार डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची कार्ये

रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल भागामध्ये अनेक तरुण दारूच्या आहारी गेले होते. अशा तरुणांना आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला. आपल्या वडिलांनी जे समाजसेवेचे व्रत स्वीकारले होते, ते व्रत पुढे सुरू राहावे यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले.

अंधश्रद्धा निर्मूलन

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सर्वांत महत्त्वाचे कोणते कार्य केले असेल, तर भोळीबाबडी जनता कर्मकांडांमध्ये अडकून होती. धर्माच्या आणि कर्मकांडाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची होणारी दिशाभूल आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या बैठकांचा माध्यमातून थांबवली.

वृक्षारोपण कार्यक्रम

आज निसर्गाचे सर्व संतुलन ढासळलेले आहे. ते संतुलन जर आपल्याला नीट करायचे असेल, तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. शासन त्यासाठी विविध उपक्रम राबवत असते आणि या उपक्रमांना हातभार लावण्याचे काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान दरवर्षी करताना दिसते. त्या प्रतिष्ठानचे प्रमुख या नात्याने त्याचे सर्व श्रेय आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाते.

रोजगार मेळावे

लोकांना रोजगाराच्या संधी कुठे आहेत, याची बऱ्याचदा माहिती नसते. माहिती सहजगत्या उपलब्ध व्हावी यासाठी विविध रोजगार मिळावे आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांची अनुयायांनी सुरू केले. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.

स्वच्छता मोहीम

अलीकडच्या काळात व्यक्तीचे आरोग्यविषयीचे प्रश्न का निर्माण झाले आहेत याचा जर आपण शोध घेतला तर आपल्या आजूबाजूला पसरलेले घाणीचे साम्राज्य. हे साम्राज्य घालवण्यासाठी शासकीय यंत्रणा कमी पडत आहेत. त्यातून लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्‌भवत आहेत.

यावर तोडगा काय म्हणून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे अनुयायी यांनी अनेक स्वच्छता मोहीम हाती घेतल्या. समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता अशा विविध स्वच्छता मोहिमा यशस्वी करून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.

व्यसनमुक्ती केंद्रांची स्थापना

अलीकडच्या काळात ढाबासंस्कृती मोठ्या प्रमाणात फसरत असताना दिसत आहे. बरेच तरुण-तरुणी शोक म्हणून किंवा आदर्श मजबूर म्हणून वेगवेगळी व्यसने करताना दिसत आहेत. अशा तरुणांना व्यसनाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अनेक ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र उभी केली. आपल्या बैठकांच्या माध्यमातून त्यांचे प्रबोधन केले.

आरोग्य शिबिरे

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत अनेक आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आदिवासी भागातील लोकांना आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. जे शिबिराचाच एक भाग म्हणून अनेक रक्तदान शिबिरेदेखील आयोजित करण्यात आली.

समाज प्रबोधन

समाजाला योग्य दिशा द्यायची असेल, तर समाजाचे उत्तम प्रबोधन होणे गरजेचे आहे. नेमके हेच कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. समाजाला सुयोग्य दिशा दाखविण्याचे काम आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.

बाल संस्कार वर्ग

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मते आपल्याला खूप मोठे बदल हवे असतील, तर आपण बालपणापासूनच बालकावरती चांगले संस्कार केले पाहिजेत आणि संस्कार व्हावेत त्यासाठीच बाल संस्कार वर्गांचे आयोजन केले जाते. बाल संस्कार वर्ग अगदी निःशुल्क असतात. कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांना सामावून घेण्याचे समाजकार्य आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले म्हणून त्यांना सन 2022चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.

रक्तदान शिबिरे

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या वेळीदेखील आवर्जून उल्लेख केला की, आपण रक्त बनवू शकत नाही, मग ज्यांना रक्ताची आवश्यकता आहे त्यांना आपण इतर निरोगी लोकांनी रक्तदान करायला हवे. जेणेकरून लोकांना जीवदान मिळेल.

कार्य कोणतेही असो... त्यातून लोकांमध्ये समाजाप्रती सेवाभाव रुजवण्याचे काम यापूर्वी आप्पासाहेबांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी केले आणि आज हेच कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी आपल्या मोठ्या साधकांसह भारतासह जगभरात पुढे नेत आहेत.

त्यांच्या कार्यास शुभेच्छा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com