Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीची या पद्धतीने घरच्याघरी पूजा करा, जाणून घ्या पूजा विधी अन् महत्व

Ashadhi Ekadashi 2023 Pooja Vidhi mahatva: तुम्ही घरच्याघरीसुद्धा एकादशीची पूजा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया पूजेचे महत्व आणि विधी
Ashadhi Ekadashi 2023 Pooja Vidhi  mahatva
Ashadhi Ekadashi 2023 Pooja Vidhi mahatvaesakal

Ashadhi Ekadashi 2023 Pooja Vidhi: आज आषाढी एकादशी आहे. विठ्ठल भक्त दुरून दुरून पंढरीला विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी येतात.

मात्र ज्यांना पंढरीला जाणे शक्य नाही. त्यांना खंत व्यक्त करण्याची गरज नाही. तुम्ही घरच्याघरीसुद्धा एकादशीची पूजा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया पूजेचे महत्व आणि विधी.

आजच्या दिवशी सकाळ संध्याकाळ उपवास करायचा असतो. आज स्नान आदी आटोपून घरच्या देवाची पूजा करावी. घरी विठूरायाची मूर्ती असल्यास तिला पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर मूर्ती व्यवस्थित पुसून तिला गुलाल किंवा बुक्का लावावा.

त्यानंतर मूर्तीला नवीन वस्त्र परिधान करावे. हार घालावा. उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा आणि विठूरायाची आरती करावी. या दिवशी तुळस तोडू नये.

आजपासून पुढील चार महिन्यांसाठी भगवान विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात.

अशी आख्यायिका आहे की चार महिन्यांच्या काळात सृष्टीचा भार भगवान शंकर सांभाळत असतात. त्यामुळे भगवान शंकरांची आराधना करावी. उपवासाला उपवासाचे पदार्थ किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. (Ashadhi Ekadashi)

Ashadhi Ekadashi 2023 Pooja Vidhi  mahatva
Ashadhi Ekadashi 2023 : विठ्ठलाच्या मूर्तीवर असलेल्या शिवलिंगांची गोष्ट खरी आहे का?

पंढरपूरच्या पाडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे, असे सांगितले जाते. त्या प्रमाणे त्या शिवलिंगाला गंध वगैरे लावून रोज पूजाही केली जाते. त्या संबंधीची अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर विठ्ठलाच्या भेटीला आले व ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले.

Ashadhi Ekadashi 2023 Pooja Vidhi  mahatva
Ashadhi Ekadashi : पंढरपुरात वारकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विखेंसोबत खेळली 'फुगडी'

विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले. पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे. कारण पांडुर म्हणजे पांढराशुभ्र आणि अंग म्हणजे शरीर.

ज्याचे अंग पांढरेशुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर. विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे आणि शंकर करपूरगौरवम म्हणजे कापराप्रमाणे गोरा आहे. पण सावळ्या विठ्ठलाने त्यास मस्तकीधारण केल्याने त्यांचे नावही धारण केले पांडुरंग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com