Mahashivratri 2024 : पंढरीतल्या विठ्ठलाच्या मूर्तीवर खरंच शिवलिंग आहे का?

महाशिवरात्रीचा उपवास केल्यास १२ एकादशींचे पुण्य लाभते, असं का म्हटलं जातं?
Mahashivratri 2024
Mahashivratri 2024esakal

Mahashivratri 2024 : आपल्या देशात अनेक मंदिरे, वास्तू अशा आहेत की आपण त्यांचे वैशिष्ठ्ये पाहून आश्चर्यचकीत होतो. गोव्यातील चर्च, तिरूपती बालाजी मंदिर, पद्मनाभस्वामी मंदिर ही पैकीच एक होय. आपल्या राज्यातील ही अनेक मंदिरे अशी आहेत. ज्यांच्या खास गोष्टी आपल्याला माहितीच नाहीत.

आता हेच बघा ना, पंढरीच्या पांडुरंगाच्या छातीवर असलेला खड्डा कसा पडला. त्याच्या पायावर उमटलेली दोन बोटे कोणाची याबद्दल लोकांना फार माहिती नाही. तसेच पंढरीच्या विठूरायाच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि त्याची रोज पूजा केली जाते. होय हे खरं आहे.

आज महाशिवरात्री आहे. त्यानिमित्तानेच आपण पांडुरंगाच्या मस्तकावर शिवलिंग कसं आलं. त्याची पूजा कशी केली जाते. तसेच महाशिवरात्रीचा उपवास केल्यास १२ एकादशींचे पुण्य लाभते. याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Mahashivratri 2024
Ashadhi Ekadashi 2023 : सौराष्ट्राची दिंडी विठ्ठलाच्या दारी!

पंढरपूरच्या पाडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे, असे सांगितले जाते. त्या प्रमाणे त्या शिवलिंगाला गंध वगैरे लावून रोज पूजाही केली जाते. त्या संबंधीची अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर विठ्ठलाच्या भेटीला आले व ते विठ्ठलाच्या मूर्तीत विलीन झाले.

विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले. पांडुरंग हे नाव शंकराचेच आहे. कारण पांडुर म्हणजे पांढराशुभ्र आणि अंग म्हणजे शरीर. ज्याचे अंग पांढरेशुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर. विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे आणि शंकर करपूरगौरवम म्हणजे कापराप्रमाणे गोरा आहे. पण सावळ्या विठ्ठलाने त्यास मस्तकीधारण केल्याने त्यांचे नावही धारण केले पांडुरंग.


समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे विठोने वाहिला शिरदेव राणा म्हणजे विठ्ठलाने शंकराला मस्तकावर वाहिले आहे. प्रख्यात कवी अनंतरावजी आठवले शंकराच्या स्तोत्रात म्हणतात.. विठ्ठले धरिले शिरी शिवलिंग ते मुक्कुटा करती।। म्हणजे विठ्ठलाने मुक्कुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले आहे.

पण दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणतात. शिव आणि विष्णू यांचे ऐक्य झालेले एकमेव तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर आहे. संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त होते. ते श्री विठुरायाच्या दर्शनालाही जात नव्हते. पण विठ्ठलाच्या करदोड्यासाठी माप घेण्यास येथील मंदिरात गेले.

Mahashivratri 2024
Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठलाची महापूजा; यंदा अहमदनगरच्या शेतकरी कुटुंबाला मिळाला पूजेचा मान

ते डोळे बांधून हाताने श्री विठ्ठल मूर्तीच्या कमरेचे माप घेऊ लागले तो शंकराची चिन्हे त्यांच्या हाताला लागली. डोळे उघडले तर श्री विठ्ठलाची मूर्ती त्यांना दिसली. त्यांचा भ्रम दूर झाला आणि शिव व विठ्ठल हे एकच आहेत, असा त्यांना साक्षात्कार झाला.


ही घटना सुमारे ७०० वर्षांपूर्वी घडली. त्यामुळेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि सध्याचे तेलंगणा राज्यातून शिवभक्त तसेच लिंगायत पथाचे धर्मगुरू श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येथे येतात.

आज असते खास पुजा

महाशिवरात्रीलाही पंढरपुरात सर्व वारकरी उपवास करतात. पांडुरंगाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. पंढरपुरात शिव आणि विठ्ठल यामध्ये भेद नाही, हेच या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. तसेच महाशिवरात्रीचा उपवास केल्यास १२ एकादशींचे पुण्य लाभते. अशी देखील वारकऱ्यांची श्रध्दा आहे. त्यावरून वारकरी सांप्रदायामध्ये देखील शिवरात्रीचे महत्त्व किती आहे, हे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com