Ashadhi Ekadashi 2023: खरंच काय आहे या वारीत ? जाणून घ्या पंढरीचा महिमा !

पंढरीच्या वाटेवरून चालणारे वारकरी आणि त्यांची वारी म्हणजे एक भक्तिमय सोहळा.
Ashadhi Ekadashi 2022
Ashadhi Ekadashi 2022sakal

पंढरीच्या वाटेवरून चालणारे वारकरी आणि त्यांची वारी म्हणजे एक भक्तिमय सोहळा ! वारी शब्द उच्चारला की आपल्या समोर पंढरीला जाणारी आपल्या लाडक्या विठुरायास , भेटण्यासाठी उत्सुक असलेली भक्ती रसात बुडालेली, टाळ मृदंगाच्या तालावर ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या नावाचा जयघोष करीत, ऊन पावसाची पर्वा न करता अखंडपणे स्वतःला व जगाला विसरून चालणारी शिस्तबध्द अशी जनसागराची साखळी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.

खरच काय आहे या वारीत ?" की आपल्यालाही या वारीत सामील व्हावेसे वाटते. जाणूया या वारीचा महिमा ! पंढरपूरची विठ्ठलाची वारी !

वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार! पंढरपूरची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचे आणि भगवंताला भेटून घरी परत यावयाचे. लाखो विठ्ठल- भक्त पंढरपूरला भेट देतात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला 'दिंडी' या नावाने ओळखले जाते. वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तीगीते, नृत्य व टाळनाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. वारी हा आनंदाचा सोहळा असतो, नव्हे आनंदाचा सण असतो

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावातून सुरू होऊन पंद्रपूरमध्ये संपणारी एक सामुदायिक पदयात्रा असते. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी या दोन्ही वेळा होते.पंढरीच्या वाटेवरून चालणारे वारकरी आणि त्यांची वारी म्हणजे एक भक्तिमय सोहळा !

वारी शब्द उच्चारला की आपल्या समोर पंढरीला जाणारी आपल्या लाडक्या विठुरायास , भेटण्यासाठी उत्सुक असलेली भक्ती रसात बुडालेली, टाळ मृदंगाच्या तालावर ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या नावाचा जयघोष करीत, ऊन पावसाची पर्वा न करता अखंडपणे स्वतःला व जगाला विसरून चालणारी शिस्तबध्द अशी जनसागराची साखळी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.

खरच काय आहे या वारीत ?" की आपल्या- लाही या वारीत सामील व्हावेसे वाटते. जाणूया या वारीचा महिमा ! पंढरपूरची विठ्ठलाची वारी !

वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार! पंढरपूरची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचे आणि भगवंताला भेटून घरी परत यावयाचे. लाखो विठ्ठल- भक्त पंढरपूरला भेट देतात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला 'दिंडी' या नावाने ओळखले जाते. वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तीगीते, नृत्य व टाळनाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो. वारी हा आनंदाचा सोहळा असतो, नव्हे आनंदाचा सण असतो

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावातून सुरू होऊन पंद्रपूरमध्ये संपणारी एक सामुदायिक पदयात्रा असते. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी या दोन्ही वेळा होते.

महाराष्ट्रातील आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका व देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेउने ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून गोवोगावच्या देवस्थानच्या दिंड्या पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपूरात श्री विठ्ठलाच्या दर्शनास • येतात. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत आहेत. या वारकरी संप्रदायात लहान-मोठा असा कोणताही भेदभाव नसतो. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे

एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच बारी असते. जो नियमित वारी करतो तो वारकरी! वारकरी जो धर्म पाळतात • त्याला 'वारकरी धर्म' म्हणतात आणि वारकरी धर्माल च ' भागवत धर्म' असे म्हणतात. 'पंढरीत वास, चंद्रभागेत स्नान अन् दर्शन

विठोबाचे → या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवेत् नाही अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला-पुरुषांच्या मनात आदराचे व श्रध्देचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते. वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात

भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या विठ्ठलाचे, पांडुरंगाचे हे भक्त असतात. आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करत असताना ते भगवंताचे विस्मरण होउ नये म्हणून गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळशी माळेची जपमाळ गळ्यात घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो.

स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टीळा लावावा, नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा, संतांचे ग्रंथ वाचावेत, नित्यनेमाने देवाच्या मूर्तिचे दर्शन घ्यावे भजन - कीर्तनात सहभाग घ्यावा, पंढरपूर वारी करावी तसेच एकादशी व्रत करावे, सात्विक आहार व सदाचरण करावे, परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील

बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे नामस्मरण करावे असा एक साधा परमार्थ व साधे वर्णन एका वारकऱ्याबद्दल सांगितले आहे.

अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे, त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न व आच्छादनाची व्यवस्था करावयाची, तहान- लेल्याची तहान जाणायची, मुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतांवर प्रेम ठेवायचे, गीता-भाग- बताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केंद्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे आणि भागवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा असे वारकऱ्यांचे भक्तीमय जीवन असते. वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना " बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम,

पंढरीनाथ महाराज की जय" असा जयघोष केला जातो. या जयघोषाला 'वारकरी महावाक्य' किंवा 'वारकरी महाघोष' असे म्हंटले जाते. आज लाखो वारकरी शेकडो दिंड्यातून पायी चालत पंढरपूरच्या आषाढी यात्रेला जातात. ही पायी चालत जाण्याची वारकरी परंपरा हजार वर्षापेक्षा जुनी आहे पणती नेमकी किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीही पंढरीची वारी होती.

ज्ञानदेवां- च्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे पंढरीचे वारकरी होते, ते दिंड्यातील वारीला जात असत, तसेच ते ज्ञानदेव व त्यांच्या भावंडानाही पंढरीच्या वारीला घेऊन गेले होते असे सांगितले जाते.

पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरच्या वारीला जात, खाल्हेर- च्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यांमध्ये 1 सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वरांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. साधू संत माय-बाप, तिही केले कृपादान

पंढरीच्या यात्रे नेले, घडले चंद्रभागास्नान " असे ज्ञानेश्वरानी एका अभंगात म्हंटले आहे, तसेच संत नामदेव एका अभंगात म्हणतात की, पांडुरंगच भक्तांना सांगत आहे की बाबारे आषाढी कार्तिकी विसरू नका मज

सांगतसे गुज पांडुरंग । " वारीची ही परंपरा भानुदास वे एकनाथ या संतानी पुढे चालविली. ती खंडित होऊ दिली नाही. त्यानंतर तुकारामां- च्या काळातही वारी मोठ्या प्रमाणात भरत होती. तुकारामां- ची परंपरा बहिणाबाई, त्यांचे चौदा टाळकरी, रामेश्वर भट्ट अशा अनेक लोकांनी पुढे चालविली. ज्ञानेश्वर महाराजां- च्या नंतर नामदेव, तुकाराम, गोरा कुंभार, नरहरी सोनार, भानुदास, निकोबा, शंकर स्वामी यांनी पंढरपूरच्या वारीचा क्रम चढता ठेवला, दिवसेंदिवस तो वाढवत नेला.

वारीची परंपरा सर्व संतानी जतन केली आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. आषाढी वारीला सर्व संतांच्या पालख्या आपा- पल्या गावातून पंढरपूरला येतात आणि कार्तिकी वारी- ला संतांच्या पालख्या पंढरपूरातून आपापल्या गावाला जातात. या शिवाय माघी वारी व चैत्री वाऱ्याही होतात, वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात.

आषाढी एकादशीला' देवशयनी एकादशी 'असेही म्हणतात. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंतच्या चातुर्मासाच्या काळात भगवान विष्णु क्षीरसागरा- मध्ये योग-निद्रिस्त होतात व चार महिन्यांनी म्हणजे कार्तिकी एकादशीला ते योगनिद्रेतून बाहेर येतात याला प्रबोधिनी एकादशी' म्हणतात.

वारीत रिंगण सोहळ्याला खूप महत्त्व आहे. रिंगणात दोन घोडे असतात. त्यातील एक अश्वारूद चोपदार असतो

व दुसरा अश्व रिकामा असतो आणि या अश्वावर ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत असा भक्तांचा विश्वास असतो. रिंगणात अश्व परिक्रमा घालतात, तेंव्हा त्यांची मस्तकी लावण्यासाठी भक्तांची झुंबड उठते. हेचि दान देगा देवा । पायधूळ

तुझा विसर न व्हावा ।।"

हा अभंग गात पाच ते दहा लाखापेक्षा जास्त जन- समुदाय असलेल्या या भक्तीच्या महासागरात, पंढरपूर. च्या वारीमध्ये कसलाही गोंधळ वा गडबड नसते. वारीमध्ये चालताना वारकरी कमीत कमी सामान नेतात. जीवन जगण्यासाठी कमीत कमी भौतिक सुख-सुविधा सोबत असतील 'ल तर जीवनात अंतिम टप्प्यापर्यंत आपण सुखाने मार्गक्रमण करू शकतो हेच आपल्याला वारी शिकविते.

एक तरी ओवी अनुभवावी 'असे संतानी संबोधले ते 1 उगीच नाही. कारण वारीला जाऊन आल्यावर, प्रत्येक गोष्ट अनुभवल्यावर आपल्याला आत्मिक ज्ञान व सुख मिळते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म 1. भेदाभेद भ्रम अमंगळ "

' हा भाव ठेऊन मनात पाप करण्याची इच्छा होऊ नये. षड्रिपूंवर ताबा असावा, परमार्थाची ओढ असावी हीच वारी मागची सद्भावना! खरच, वारी म्हणजे डोळे दिपवून टाकणारा एक सोहळा! वारीत सुविधा नसतात पण आनंद अस्तो. वारकरी एकमेकांशी खूप प्रेमाने, आदराने व आस्थेने वागतात.

'एकमेकांना 'माऊली' म्हणून संबोधतात.

" देव पहायला गेलो व देवची होऊन गेलो" अशी भावना भक्ताची होते. वारकऱ्यांचे हे आपापसातील निर्मळ प्रेम पाहून आपल्यातील सात्त्विक भाव जागरूक होतो. व हा सात्विक भाव आपल्याला आध्यात्मिकते- कडे घेऊन जावो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना".

शैलजा अजित निटवे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com