Ashadhi Wari 2023 : वारीत चालताना वारकरी 'जय जय रामकृष्ण हरी'चाच जप का करतात?

संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना स्वप्नदृष्टांतात हा मंत्र मिळाला होता.
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023 esakal
Updated on

Why Warkari Chant Jai Jai Ram Krishna Hari : संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना स्वप्नदृष्टांतात गुरुदिक्षा मिळाली आणि राम कृष्ण हरी हा गुरुमंत्र मिळाला. हाच मंत्र वारकरी संप्रदायाचा खुला मंत्र झाला. या मंत्रातून वारकरी संप्रदायाला जणू परमार्थाची गुरुकिल्लीच मिळाली.

संत तुकाराम महाराज या मंत्रात आकंठ बुडाले. आध्यात्मिक उन्नतीचे गमक त्यांना मिळाले होते. ते याच नाम जपात तिन्ही त्रीकाळ तल्लीन असत. तेच झीरपत वारकरी संप्रदायाकडे आले आहे.

अनेकांचे दुःख हरण करणाऱ्या या मंत्राने अनेकांच्या जीवनाची नैय्या पार लावली आहे. दुःख, वेदना, त्रास या सगळ्याला विसरून भगवंताच्या स्मरणात तल्लीन करण्याची ताकद या मंत्रात आहे. मैलोन् मैल पायी चालत त्या पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने सर्व ताप हरण्याची क्षमता या तीन शब्दांमध्ये आहे. यावर वारकऱ्यांची निःसीम श्रद्धा आहे. त्यामुळेच वारकरी पंढरीची वारी करताना अखंड या मंत्राचा जप करत असतात.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023 : संविधान अन् संत विचारांमध्ये नेमके साम्य काय माहितीये?

राम कृष्ण हरी चा अर्थ

कृष्ण आणि हरी हे दोन्हीही कृष्णाचीच नावे. हरी हे विष्णूचे नाव धरले तर राम आणि कृष्ण दोन्ही विष्णूचेच अवतार झाले. म्हणजे थोडक्यात शब्द तीन असले तरी नाव एकच झालं. मग या तीन शब्दांना एकत्र गुंफण्याचा अर्थ काय?

तर राम म्हणजे सर्व सजीवांमध्ये असणारी चेतना. कृष्ण म्हणजे आकर्षण शक्ती. आणि हरी म्हणजे पीडा हरणारा. याचाच अर्थ सर्व जीवांच्या पीडांना आकर्षून त्यांचे हरण करणाऱ्या परमात्म्याचा जय जयकार म्हणजे 'जय जय राम कृष्ण हरी'.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023 : वारीत रिंगण होत असलेल्या वाखरीच्या पुरातन विहिरीचं नाव बाजीराव विहीर का पडलं?

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com