Ashadi Ekadashi 2023 : दुमदुमली पंढरी; चंद्रभागेला भक्तीचा महापूर, भाविकांची मांदियाळी

चंद्रभागा स्नान, नामदेव पायरीचे दर्शन,मंदिर प्रदक्षिणा आणि कळस दर्शन हा नित्यनेम वारकऱ्यांनी केला.
ashadi ekadashi 10 lakh warkari at pandharpur vitthal rukmini temple wari 2023
ashadi ekadashi 10 lakh warkari at pandharpur vitthal rukmini temple wari 2023sakal

पंढरपूर : कमालीचा भक्तीभाव मनी बाळगून शेकडो किलोमीटरची पायी आलेल्या आणि वाहनांमधून एकादशीसाठी आलेल्या सुमारे दहा लाख वारकऱ्यांनी आपली वारी विठुरायाच्या चरणी रुजू केली.

चंद्रभागा स्नान, नामदेव पायरीचे दर्शन,मंदिर प्रदक्षिणा आणि कळस दर्शन हा नित्यनेम वारकऱ्यांनी केला.टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने पंढरीनगरी दुमदुमून गेली होती. त्यामुळे पंढरीत अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर, या अभंगाची प्रचिती आली.

आजि सोनियाचा दिनु।

वर्ष अमृताचा धनु ।।

हरि पाहिला रे हरि पाहिला रे।

सबाह्याभ्यंकरी अवघा व्यापक मुरारी।।

पंढरीत मंदिर प्रदक्षिणा करताना कळसाच्या दर्शनाच्या वेळी वारकऱ्यांच्या मनात ही भावना होती. आपली परंपरेची वारी रुजू झाली, याचा मनस्वी आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

बुधवारी रात्री उशिरा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तिनाथ महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताई, संत एकनाथ महाराज, संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यांसमवेत लाखो वारकरी पायी पंढरीत दाखल झाले.

ashadi ekadashi 10 lakh warkari at pandharpur vitthal rukmini temple wari 2023
Ashadi Wari 2023 : रिमझिम सरींनी वारकरी सुखावले; रांगोळीच्या पायघड्यांवरून पालखीचा सोलापूरमध्ये प्रवेश

पहाटे तीनपासूनच चंद्रभागेचा तीर भाविकांच्या गर्दीने भरून गेला होता. चंद्रभागेला पाणी सोडल्यामुळे वारकऱ्यांना सोयीचे झाले. सकाळी आठच्या सुमारास माऊलींची पादुका मालक राजाभाऊ आरफळकर यांनी चंद्रभागा स्नानासाठी नेल्या.

त्या साडेअकराच्या सुमारास पुन्हा नाथ चौकातील मंदिरात आल्या. पादुका दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सकाळी नऊच्या सुमारास स्नान घालण्यात आले.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे तसेच विद्यमान सोहळाप्रमुख, आजी माजी विश्वस्त, मानकरी उपस्थित होते. सोपानदेव महाराजांच्या पादुका सकाळी सहा वाजता स्नानासाठी निघाल्या. मानकरी केंजळे बंधू यांनी स्नान घातले.

त्यावेळी सोहळाप्रमुख त्रिगुण महाराज गोसावी उपस्थित होते. पालखी पुन्हा नऊ वाजता मंदिरात आली. मुक्ताबाई यांच्या पादुका चार वाजता स्नानासाठी निघाल्या. यावेळी रवींद्रभैय्या पाटील, सोहळाप्रमुख रवींद्र महाराज हरणे उपस्थित होते.

या वेळी निवृत्तिनाथ महाराजांच्या पादुकांनाही चंद्रभागेत स्नान घालण्यात आले. पुंडलिक दर्शनाला रांग होती. संत नामदेव महाराजांच्या पादुका दर्शनासही गर्दी होत होती. त्यामुळे भाविकांनी वारकऱ्यांची परंपरेप्रमाणे हे सर्व उपचार पूर्ण करून विठ्ठलाच्या मंदिराला प्रदक्षिणा करून कळसाचे दर्शन घेत होते.

आषाढी एकादशीला मंदिराच्या कळसावरच विठुराया असतो, अशी वारकऱ्यांची भावना असल्याने बहुतांश वारकरी कळस दर्शन घेऊनच वारी पांडुरंगाच्या चरणी रुजू करतात. दर्शनबारी गोपाळपुरापर्यंत गेली होती.

श्री विठ्ठल, रखुमाई, राही यांच्या रथाची मिरवणूक दुपारी निघाली. त्यावेळी भाविकांनी गर्दी केली होती. दरम्यान, दिवसभर मठ, धर्मशाळा वारकऱ्यांचा सुरू असलेला हरिनामाचा जयघोष सुरू होता.

काकडा, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन ठिकठिकाणी सुरू होते. उपवास असल्याने सर्वत्र फराळ सुरू होता. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला.

ashadi ekadashi 10 lakh warkari at pandharpur vitthal rukmini temple wari 2023
Ashadi Wari 2023 : विदर्भाची पंढरी म्हणून समजली जाणारी, गजानन महाराज पालखीचे माचनूर येथे स्वागत...

पेरण्यांमुळे वारकऱ्यांना काळ्या आईची ओढ

गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या सर्वदूर पाऊस सुरू झाला आहे. यंदा पेरण्या नसल्याने अनेक जण वारीला येऊ शकले नाही. ते थेट एकादशीला दर्शनाला दाखल झाले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरूवात झाली आहे.

त्यामुळे पेरण्या उरकण्यासाठी वारकरी आपली वारी रुजू करून परतताना दिसत आहेत. एक दिवसासाठी आलेले वारकरी आणि वारीत आलेले वारकऱ्याची नित्यनेम करून घरी परतताना दिसत होते.

सकाळपासून एसटी स्थानकाकडे वारकऱी जाताना दिसत होते. सतरा-अठरा दिवस पायी वारी करून विठुमाउलीची वारी पूर्ण केल्यानंतर वारकऱ्यांना आता आपल्या काळ्या आईची ओढ लागली आहे.

आनंद वारी

निष्ठेची, त्यागाची, साधनेची, एकात्मतेची, समतेची, प्रेभभावाच्या असलेली आषाढी वारीच्या आनंदोत्सवाचा प्रवाह भक्तीरुपी चंद्रभागेत एकरूप झाला. निघताना काही प्रमाणात कमी दिसणाऱ्या संख्येने पंढरीत एकादशीला सरासरी गाठली. त्यामुळे सावळ्या विठुरायाशी एकनिष्ठ भक्तीची प्रचिती पुन्हा एकदा आली.

ashadi ekadashi 10 lakh warkari at pandharpur vitthal rukmini temple wari 2023
Ashadi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला घ्या 'या' खास पदार्थांचा आस्वाद..

वारी ही वारकऱ्यांची साधना आहे. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे कोणतेही निमंत्रण नसताना सर्व काही सोडून वारकरी वारीत एकरूप होतो. रस्त्याने ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता वारकरी विठ्ठलाच्या निष्ठेच्या बळावर चालत राहतो, यंदा आळंदी ते नातेपुतेपर्यंत सोहळा रणरणत्या उन्हात तरतळत होता.

माळशिरसपासून वातावरणात बदल झाला. पण पुरंदवडे परिसरात वगळता मोठा पाऊस वाटचालीत लागला नाही. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये चिंता होती. पंढरीत पोचल्यानंतर तोच वारी पूर्ण केल्याचा आनंद. वारीत आनंद आहे, असे सर्वच म्हणतात.

ashadi ekadashi 10 lakh warkari at pandharpur vitthal rukmini temple wari 2023
Ashadi Wari 2023 : संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा ऊन सावलीच्या खेळात वाखरीत पोहोचला

पण त्याची अनुभूती घेणाऱ्यालाच त्यांची प्रचिती येते, असे वारकऱ्यांचे म्हणणे असते. त्यामुळे हा वारी हा आंनदाचा भक्तीप्रवाह आहे. जो दरवर्षी सतरा-अठरा दिवस सुरू राहतो, अन् न सांगते सारे त्यात एकरुप होतात.

अनेक गुणांनीयुक्त असलेली ही वारी समाजोन्नतीसाठी निश्चित फायदेशीर आहे. त्यामुळे शक्ती अनुभवण्यासाठी भारतातील अनेक राज्यांतील वारकऱ्यांचा ओढा वारीत वाढत आहे. तसेच अनेक देशांतील भाविकांनाही भुरळ पाडली होती. त्याचा अभ्यासही अनेक परदेशी वारकरी करीत आहेत.

वारी विशेष

  • संत नामदेव पायरीजवळ भाविकांच्या गर्दीला पोलिस पांडुरंग-पांडुरंग असे भजनाचा घोष उत्साहवर्धक

  • सकल संतांच्या पादुकांना स्नान व नगरप्रदक्षिणा

  • दुपारनंतर पावसाचा शिडकावा

  • शहराच्या मुख्य भागात गर्दी असूनही पोलिसांचे काटेकोर नियोजन

  • पासष्ठ एकरांत वारकऱ्यांची चांगली सोय

ashadi ekadashi 10 lakh warkari at pandharpur vitthal rukmini temple wari 2023
Ashadi Ekadashi 2023 : अनुभवाची वारी...चुकू न दे हरी...हेचि मागणे तुझ्या दारी.. पांडुरंगा!

विक्रेत्यांचे सर्वत्र अतिक्रमण

आषाढी दशमी, एकादशीला होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे पंढरपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची वाहने येऊ शकत नाहीत आणि याचा गैरफायदा घेत परगावच्या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती.

स्टेशन रोड, चौफाळा व मंदिर परिसर वगळता प्रदक्षिणा रोड, भक्ती मार्ग, संत पेठ, शिवाजी चौक ते पंढरपूर अर्बन बँक रस्त्यासह शहरातील सर्वच उपरस्त्यांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे एकादशीनिमित्त पंढरीत आलेल्या भाविकांना फिरणे जिकिरीचे झाले होते.

दर्शनासाठी १८ तास

श्री विठ्ठलाच्या पददर्शनाला गुरुवारी १५ ते १८ तास लागत होते. प्रदक्षिणा घालत असताना दिंडीतील वारकऱ्यांच्या ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोषाने आणि अभंग व टाळ, मृदंगाच्या गजराने पंढरीतील वातावरण भक्तिमय झाले होते.

ashadi ekadashi 10 lakh warkari at pandharpur vitthal rukmini temple wari 2023
Ashadi Ekadashi 2023 : ऐका पंढरीचे महिमान...

दुपारी पावसाला सुरवात झाल्याने भाविकांची तारांबळ उडाली. पाऊस जोर धरतोय, असे वाटत असतानाच काही काळानंतर पाऊस थांबला. त्यामुळे लाखो भाविकांना यात्रेच्या सोहळा मनसोक्त अनुभवता आला.

पहाटे श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग रिद्धी सिद्धी मंदिराच्या पुढे गेली होती. श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलेले किसन अवघड (रा. शेवते, ता. व जि. जालना) ''सकाळ''शी बोलताना म्हणाले, बुधवारी दुपारी दोन वाजता दर्शन रांगेत उभे राहिलो होतो. गुरुवारी पहाटे चार वाजता श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले.

पंढरीतील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी

पंढरपूर शहरातील रेल्वे पुलाखालील दोन्ही बोगदे, सरगम चौक, टाकळी रेल्वे बोगदा, पद्मावती उद्यानासमोरील रस्ता, तुळशी वृंदावनकडे जाणारा रस्ता, बायपास रस्ता यासह प्रमुख चौकामध्ये वाहतूक कोंडी झाली होती.

ashadi ekadashi 10 lakh warkari at pandharpur vitthal rukmini temple wari 2023
Ashadi Ekadashi 2023 : प्रतिपंढरपूर वैष्णव गडावर विठ्ठल रुक्माईचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

उपनगरातील रस्त्यांच्या दुतर्फा ट्रक व इतर वाहने लावण्यात आली होती. त्यामुळे कोंडीमध्ये भर पडल्याने भाविकांना प्रचंड मनस्ताप झाला. अरुंद रस्त्यांवर एकाच वेळी शेकडो वाहने आल्याने वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांची देखील दमछाक झाली होती.

एकादशीची क्षणचित्रे

  • एकादशीला दहा ते बारा लाख भाविकांची गर्दी

  • मानाचा पालख्यांची नगर प्रदक्षिणा

  • चंद्रभागेच्या वाळवंटात वैष्णवांची दाटी, रंगले विविध खेळ

  • श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंधरा ते अठरा तास

  • आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची रथयात्रा

  • वाहतूक कोंडीमुळे भाविकांना मनस्ताप

  • हजारो भाविकांना फराळाचे वाटप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com