Ashadi Ekadashi 2023 : प्रतिपंढरपूर वैष्णव गडावर विठ्ठल रुक्माईचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

आषाढी एकादशीनिमित्त वैष्णव गडाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली
ashadi ekadashi 2023 thousands of devotees took darshan of Vitthal Rukmai Vaishnav Fort sindkhed raja
ashadi ekadashi 2023 thousands of devotees took darshan of Vitthal Rukmai Vaishnav Fort sindkhed rajasakal

सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून वैष्णव गडाची ओळख आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो भक्त वैष्णव गडावर येवुन विठ्ठल रुक्माईची दर्शन घेतात.आषाढी एकादशीनिमित्त  वैष्णव गडाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

वैष्णव गडावर सकाळी ५.३० मिनिटाने दुसरबीड येथील वसंतराव नारायण उदावंत दांपत्यच्या हस्ते विठ्ठल रुक्माईची महापूजा व अभिषेक करण्याचा या दांपत्याना मान मिळाला होता.

यावेळी उदावंत परिवारातील सदस्य,हरिभक्त परायण सानप गुरुजी,पंढरीनाथ घुगे व संस्थांचे विश्वस्त उपस्थित होते,त्यानंतर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी सुरू केली होती.यावेळी देवमूर्ती जि.जालना येथील गणेश जाधव यांनी मंदिराच्या गाभायात सुंदर पद्धतीने सजावट करण्यात आली होती,

ashadi ekadashi 2023 thousands of devotees took darshan of Vitthal Rukmai Vaishnav Fort sindkhed raja
Ashadi Wari 2023 : संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा ऊन सावलीच्या खेळात वाखरीत पोहोचला

मंदिर गाभाऱ्याशिवाय पायरी,सभामंडप याठिकाणीही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

आषाढी एकादशीच्या दिवशी केलेली आकर्षक फुलनांची सजावट व विद्युत रोषणाई अधिक प्रसन्न करीत होती.आषाढी एकादशीच्या निमित्ताने सजवलेल्या लाडक्या विठूरायाचे रूप सजावटीमुळे अधिकच सुंदर दिसत होते.

पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक भक्त दर्शनासाठी जातात; परंतु वारकरी संप्रदायामधील असंख्य भाविक भक्तांना पंढरपूरला जाणे शक्य झाले होत नाही.

ashadi ekadashi 2023 thousands of devotees took darshan of Vitthal Rukmai Vaishnav Fort sindkhed raja
Ashadi Wari 2023 : वारीच्या वाटेवर परमोच्च आनंदोत्सव; उभे रिंगण पाहण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी

अशा हजारो भाविक भक्तांनी तारीख २९ जुन रोजी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र वैष्णव गडावर सकाळी ६ वाजतापासूनच रूक्मिणी पाडुरंगाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तालुक्यासह परिसरातील ६५ दिंड्या वैष्णव गडावर दाखल झाल्या होत्या.

आषाढी एकादशी निमित्ताने भक्तांसाठी फराळ,चहाची,सकाळी ६ वाजेपासून सुरुवात करण्यात आली होती.यावेळी हजारो भक्तांनी फराळ व चहाचा लाभ घेतला.

ashadi ekadashi 2023 thousands of devotees took darshan of Vitthal Rukmai Vaishnav Fort sindkhed raja
Ashadi Ekadashi 2023 : अनुभवाची वारी...चुकू न दे हरी...हेचि मागणे तुझ्या दारी.. पांडुरंगा!

वैष्णव गडावरील रांगोळी भक्ताचे आकर्षक ठरल्या होत्या, यावेळी वैष्णव गडावर हजारो भक्तांसह दाखल झाले होते. त्यामुळे वैष्णव गडाला प्रतीपंढरपूरचे रूप पहायला मिळत होते.

सामाजीक,राजकीय,धार्मिक,शैक्षणिक क्षेत्रातील तसेच विविध मान्यवरांनी भेट देवून दर्शन घेतले.ठाणेदार केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक युवराज राठोड, बालाजी सानप, पोलीस कर्मचारी श्रावण डोंगरे, संदीप डोंगरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com