Ashadi Wari 2023 : माऊलीऽ, पायाला गोळे आलेत ना!, हे मलम लावा, वारकऱ्यांच्या सेवेतच विठ्ठल सेवेची अनुभूती

वारीतील आरोग्यदूतांची भावना; शारीरिक त्रासावर ‘माऊलीं’कडून उपाय
ashadi wari 2023 health doctor warkari help medical culture vitthal rukmini
ashadi wari 2023 health doctor warkari help medical culture vitthal rukmini sakal

तरडगाव : ‘माऊलीऽ, ही गोळी रात्री झोपताना घ्या, ताप कमी होईल... माऊलीऽ, पायाला गोळे आलेत ना!, हे मलम लावा, ’ हे संवाद आहेत, वारीत सेवा करणाऱ्या आरोग्यदूत व वारकऱ्यांमधले. एकीकडे विठुरायाची ओढ, दुसरीकडे आग ओकणारा सूर्य. पण प्रकृती बिघडली तरी नेमधर्म न सोडणारे वारकरी अन् भक्तांची सेवा हीच विठ्ठलसेवा मानणारे आरोग्यदूत. भक्तिरुपी मानवतेच्या प्रवाहात निघालेल्या भक्तांच्या सेवेसाठी हजारो हातांचीही आरोग्य वारी सुरू आहे.

पंढरीच्या वाटेने निघतानाच पावसाने ओढ दिल्याने उन्हाचा त्रास होणार हे निश्चित झाले होते. वारीच्या उत्तरार्धात वरुणराजाचे आगमन होईल, असा हवामान विभागानेही अंदाज दिला. त्यामुळे अगदी आळंदीपासूनच ३४-३५ अंश सेल्सिअस तापमानात वारी पंढरीकडे निघाली. आळंदीपासून लोणंदपर्यंतच्या वाटचालीत रणरणत्या उन्हाने सोहळ्यावर परिणाम राहिला.

त्यामुळे उष्म्याचा वारकऱ्यांना त्रास झाला. तसेच धुळीने वारकरी हैराण झाले. वाल्ह्याच्या तळावर धुळीचा त्रास होऊन वारकऱ्यांना खोकला, घसा, तापाचा त्रास झाला. मोठ्या प्रमाणात स्वयंसेवा संस्था, दानशुरांनी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी वाटप केले.

वारीत मोठ्या प्रमाणात रुग्णालयांचे केंद्र वाटेने असतात. अगदी शंभर फुटाच्या अंतरावर औषध व मदत केंद्र आहेत. त्यामध्ये स्थानिक प्रशासन तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणात रुग्णालयांनी फिरती केंद्र मदतीसाठी पाठविली आहेत. त्यामुळे त्रास झाल्यास वारकरी या केंद्रांवर औषधे घेऊन पुढील वाटचाल करत आहेत.

ashadi wari 2023 health doctor warkari help medical culture vitthal rukmini
Ashadi Wari 2023 : चालों वाटें आम्हा तुझाचि आधार! पंढरीकडे निघालेला वैष्णवाचा सोहळा बारामतीत मुक्कामी

मोठ्या प्रमाणात आरोग्यदूत वारीच्या वाटेवर सेवा देत आहेत. कोणतेही शुल्क घेतले जात नाही. काही सलग अठरा दिवसांची आरोग्यवारी पूर्ण करतात. या वारीसाठी वैद्यकीय औषधांची तजवीज ही मंडळी आधीच करून ठेवतात.

या आरोग्य दुतांच्याही सेवेच्या अनेक वाऱ्या झाल्या आहेत. लोणंदमधील आरोग्य केंद्रावर मंगळवारी (ता. २०) घसादुखी, डोकेदुखी, जुलाब, ताप आणि पायाला गोळे येण्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार रांगेत उभे राहून वारकरी औषधे घेत होते. डॉक्टरांना ‘माऊली’ म्हणत आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत माहिती देत होते, तर ‘माऊली, हे औषध घ्या’ असे डॉक्टर त्यांना सांगत होते. हा संवाद अनेक ठिकाणी सुरू होता.

ashadi wari 2023 health doctor warkari help medical culture vitthal rukmini
Ashadi Wari 2023 : 'पुंडलिक वरदे'', ''ज्ञानोबा तुकाराम'' जयघोषात बेलवाडीतील पहिला गोल रिंगण सोहळा उत्साहात

वारकरी संप्रदायात परोपकार हा संस्कार आहे. वारीत मानवता हाच धर्म असतो. वारीत प्रत्येकजण एकमेकांना मदत करतो. वारकऱ्यांची सर्वच यंत्रणा काळजी घेतात. त्यात आरोग्य यंत्रणा ही आघाडीवर असते. ‘वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा’ ते मानतात.

वारीचा बोध

  • परोपकाराचा पावलोपावली प्रत्यय

  • वैद्यकीय मदतीसाठी हजारो हातांचा सरसावतो समुदाय

  • सामाजिक कामात पुढाकार घेण्याची वृत्ती

  • सकारात्मक आध्यात्मिक प्रवाहातील भक्तांबाबत आत्मीयतेची भावना

  • वारीत मानवता जगणाऱ्या वाटसरुंच्या आरोग्याची काळजी

ashadi wari 2023 health doctor warkari help medical culture vitthal rukmini
Ashadi Wari 2023 : तळपणारा सूर्य अन् रंगलेले रिंगण; माऊलींचा पालखी सोहळा तरडगाव मुक्कामाला थांबली

दररोज चार ते पाच हजार वारकऱ्यांना सेवा देतो. उन्हामुळे जुलाब, तापाचे रुग्ण जास्त आहेत. सेवा देताना विठ्ठलसेवेचा भाव असतो.

- डॉ. सुचेता काळे, मायमर मेडिकल कॉलेज, तळेगाव दाभाडे

लोणंदजवळ दरवर्षी आम्ही महाआरोग्य वारीच्या माध्यमातून वैद्यकीय मदत केंद्र करतो. सकाळपासून दीड हजार वारकऱ्यांना औषधे दिली. त्यांच्या सेवेत ईश्वरसेवा पाहतो.

- डॉ. विनय पाटील, यश सोशल फाउंडेशन, लोणंद

गेल्या तीन दिवसांपासून मेडिकल केंद्र सुरू केले आहे. या काळात सुमारे वीस लाख रुपयांच्या औषधांचे वाटप केले. आठ डॉक्टरांचे पथक येथे कार्यरत आहे. लहान शस्त्रक्रियेची व्यवस्थाही आहे. वारकरी माऊलींच्या सेवेचा आनंद गेल्या आठ वर्षांपासून घेत आहोत.

- मयुरेश धानोरकर, समन्वयक, माऊली मित्र मंडळ, नांदेड

वारीत चालताना शरीराला काही प्रमाणात यातना होतात. पण माऊलींबरोबर चालताना मन थकत नाही. माऊलींचे बळ सोबत असते. यंदा उन्हामुळे थोडा त्रास झाला. पण माऊलींच्या रूपाने डॉक्टर रस्त्याला असतात. पंढरपूरला न्यायला माऊली सक्षम आहे.

- जिजाबाई नखाते, ज्येष्ठ वारकरी, उस्मानाबाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com