Ashadi Wari 2023 : माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान; पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात स्वागत

सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करून दोन दिवसांच्या मुक्कामी लोणंद नगरीत पोहोचला
ashadi wari sant dyaneshwar maharaj palkhi at satara lonand wari culture warkari
ashadi wari sant dyaneshwar maharaj palkhi at satara lonand wari culture warkari sakal

लोणंद : आकर्षक रांगोळी...फुलांच्या पायघड्या...माऊली नामाचा जयघोष...अशा उत्साही वातावरणात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. त्यानंतर सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करून दोन दिवसांच्या मुक्कामी लोणंद नगरीत पोहोचला.

वाल्हेजवळील शुकलवाडी पालखी तळावर आज पहाटे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांना रुद्राभिषेक करण्यात आला. सोहळा सहा वाजता नीरेच्या दिशेने मार्गस्थ झाला. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात सोहळा साडे दहाला पोचला.

ashadi wari sant dyaneshwar maharaj palkhi at satara lonand wari culture warkari
Ashadi Wari 2023 : हरिनामाचा जयघोष करीत करीत माउलींच्या पालखी वाल्ह्यात मुक्कामासाठी पाेहाेचली ...

श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन अणि दुतर्फा थांबलेल्या नीरा ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली. आज पुणे जिल्ह्यातील शेवटचा टप्पा असल्याने आणि नीरास्नानानंतर सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याने दोन्ही बाजूच्या वारीतील महसूल, पोलिस प्रशासनाने एकमेकांना निरोपाचा नारळ देत गळाभेट घेतली.

नीरा येथे (ता. पुरंदर) दुपारच्या विसावा आटोपून सोहळा दुपारी एक वाजता लोणंदकडे येण्यासाठी निघाला. पुलावरून पालखी रथ नीरा नदीच्या तीरावर येताच पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर पादुका घेत स्नानासाठी नदीच्या दिशेने निघाले.

ashadi wari sant dyaneshwar maharaj palkhi at satara lonand wari culture warkari
Ashadi Wari 2023 : चालों वाटें आम्हा तुझाचि आधार! पंढरीकडे निघालेला वैष्णवाचा सोहळा बारामतीत मुक्कामी

या वेळी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, राजाभाऊ चौधरी, रामभाऊ चोपदार उपस्थित होते. संपूर्ण घाटावर फुलांच्या पायघड्या केल्या होत्या. दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना चंदन, अत्तराचा लेप देत स्नान घातले. या वेळी भाविकांनी माऊलीनामाचा गजर केला. दोन्ही पुलांवर व दोन्ही तीरावर उभे राहून हजारो भाविकांनी नयनरम्य सोहळा अनुभवला.

स्नानानंतर माऊलींच्या पादुका रथातील पालखीत विराजमान केल्या. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण यांनी सोहळ्याचे स्वागत केले. या वेळी भगव्या पताका उंचावत आणि टाळ मृदंगाचा गजर करीत सोहळा पाडेगावमार्गे लोणंद नगरीत दोन दिवसांच्या मुक्कामी विसावला.

ashadi wari sant dyaneshwar maharaj palkhi at satara lonand wari culture warkari
Ashadi Wari 2023 : ‘आयटीयन्स’ अनुभवताहेत वारीतील संस्कार

वाहतूक व्यवस्थेत ढिसाळपणा

शुकलवाडीतून निघताना पहाटेपासून दिंड्यांची वाहने वाहतूक कोंडीत अडकून होती. आळंदीपासून पुणे जिल्हा पोलिसांचा बंदोबस्त चांगला होता. आज बंदोबस्तात ढिसाळपणा दिसून आला. त्यामुळे दिंड्यांची वाहने नीरा तसेच लोणंदमध्ये पोचण्यास उशीर झाला. त्यामुळे वारकऱ्यांचे हाल झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com