Astro Tips : मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips : मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या

Astro Tips : मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या

1 of 10

अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 24 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+4=6 आहे. म्हणजेच 6 हा अंक त्या व्यक्तीचा मूलांक म्हटला जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजे 12 असेल, तर त्याचा मूलांक 1+2=3 असेल.

तर जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष यांची बेरीज भाग्यांक म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 21-04-1990 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला तुमचा भाग्यांक म्हणता येईल. 2+1+0+4+1+9+9+9=35=8 म्हणजे त्याचा भाग्यांक आहे.

दैनंदिन अंकशास्त्रानुसार तुमचे तारे तुमच्या रॅडिक्सच्या आधारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे सांगते. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात याचा अंदाजा तुम्ही लावू शकतात.

अंक 1

संघर्ष होऊ शकतो. राजकीय नेत्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती मिळवा.

भाग्यवान क्रमांक: 3

शुभ रंग: पिवळा

3 of 10

अंक 2

आज प्रगतीची शक्यता आहे. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि राग टाळा. मालमत्तेवरून वाद होऊ शकतो. दुसऱ्याशी बोलतांना तुमच्या शब्दांचा विचार करा. कोणत्याही प्रकारचे व्यवहार टाळा.

भाग्यवान क्रमांक: 4

शुभ रंग: निळा

4 of 10

अंक 3

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. आज काळजीपूर्वक वाहन चालवा आणि आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्या. जोडीदार तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल

भाग्यवान क्रमांक: 7

शुभ रंग: लेमन येलो

5 of 10

अंक 4

आज तुमची प्रलंबित प्रकरणे निकाली निघू शकतात. नातेवाईकांकडून काही वाईट बातमी मिळू शकते.

भाग्यवान क्रमांक: 12

शुभ रंग: स्काय ब्लू

6 of 10

अंक 5

जीवनात आनंद मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होईल. शत्रूंपासून सावध राहा.

भाग्यवान क्रमांक: 8

शुभ रंग: हिरवा

7 of 10

अंक 6

महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. व्यवसायात भागीदारीतून फायदा होईल. व्यस्ततेमुळे तुम्ही वैयक्तिक आयुष्यात कमी वेळ देऊ शकाल.

भाग्यवान क्रमांक: 4

शुभ रंग: जांभळा

8 of 10

अंक 7

वाहन जपून चालवा. आर्थिकदृष्ट्या कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नका. निरर्थक संभाषणात वेळ वाया जाईल. प्रभावशाली लोकांचे सहकार्य मिळेल.

भाग्यवान क्रमांक: 2

शुभ रंग: गुलाबी

9 of 10

अंक 8

या दिवशी महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुमचे शब्द काळजीपूर्वक वापरा. आर्थिक स्थितीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

भाग्यवान क्रमांक: 1

शुभ रंग: हिरवा

10 of 10

अंक 9

लव्ह लाइफमध्ये गैरसमजांमुळे नाते कमकुवत होऊ शकते. प्रत्येक विषयाचा नीट विचार करा. कायदा आणि लेखकांसाठी दिवस चांगला आहे.

भाग्यवान क्रमांक: 3

शुभ रंग: लाल

Disclaimer: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणताही गोष्टींचे समर्थन करत नाही. यासाठी ज्योतिष्य तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्यावा.