Astro Tips : हे व्रत केल्याने संपत्ती मिळण्याची इच्छा होईल पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

astro tips

Astro Tips : हे व्रत केल्याने संपत्ती मिळण्याची इच्छा होईल पूर्ण

महादेवांना समर्पित प्रदोष व्रत खूप शुभ आहे. या व्रतामध्ये शिव परिवाराची पूजा केली जाते. प्रदोष काळात केलेली शिव पुजा भाग्य उजळण्याचे प्रतिक आहे .सूर्यास्त आणि रात्र या दरम्यानच्या कालावधीला प्रदोष काल म्हणतात. असे मानले जाते की प्रदोष काळात भगवान महादेव कैलास पर्वतावर प्रसन्न मुद्रेत नृत्य करतात.असेही मानले जाते की एकदा चंद्र देवाला क्षयरोग झाला आणि ज्या दिवशी भगवान महादेवाने त्यांना या रोगापासून मुक्त केले तो दिवस त्रयोदशी तिथी म्हणजेच प्रदोष तिथी होय.

प्रदोष व्रत विशेषत: कर्जबाजारी असलेल्या किंवा जमीन, इमारत, मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी करावे. प्रदोषकाळात केलेल्या पूजेचे फळ द्विगुणित होते. प्रदोष व्रत करताना दिवसभर डोक्यावर व गळ्यावर कुंकू तिलक लावावे. या दिवशी पूजेच्या ठिकाणी मंगल यंत्राची स्थापना करा. या दिवशी विष्णु सहस्रनामाचे पठण करावे. प्रदोषकाळात शिवाभिषेक करा.

प्रदोष व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी, फळे आणि मिठाईचा नैवेद्य द्यावा. प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा आणि कथा वाचन करावे. भगवान शंकराची आरती व प्रसाद वाटप झाल्यावर शेवटी प्रसाद स्वतः घ्यावा. प्रदोष तिथीला संध्याकाळी पाच वेगवेगळे रंग घेऊन शिव मंदिरात जावे आणि त्या रंगांनी सुंदर रांगोळी काढावी.

रांगोळीच्या मध्यभागी तुपाचा दिवा लावावा आणि हात जोडून भगवान शंकराचे ध्यानस्मरन करावे.असे केल्याने तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील. प्रदोष तिथीला शिव मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावा. असे केल्याने चांगले आरोग्य प्राप्त होते. वैवाहिक जीवनात मधुरता येण्यासाठी या दिवशी भगवान शंकराला दह्यात मध मिसळून अर्पण करावे. या दिवशी ओम नमः शिवाय चा जप करत राहा. असे केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल