Astro Tips for March 2023 : मार्च महिना ठरणार 'या' राशींसाठी तापदायक... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips for March 2023

Astro Tips for March 2023 : मार्च महिना ठरणार 'या' राशींसाठी तापदायक...

March Month Rashifal : मार्च महिना सुरु झाला आहे. त्यामुळे या महिन्यात आपल्याला ग्रहांची साथ मिळणार का? असा प्रश्न पडला असेल ना? ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिना खास असणार आहे. या महिन्यात बुध, शनि, सूर्य आणि शुक्र आपली स्थिती बदलतील. यामुळे काही राशींना फायदा तर काही राशींचं नुकसान होऊ शकतं.

या चार राशींच्या अडचणीत होणार वाढ

मेष : मेष राशीत राहू आधीच ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. ग्रहांच्या विचित्र स्थितीमुळे कौटुंबिक कलह वाढू शकतो. कितीही काम करा अपेक्षित फळ मिळणार नाही, आजारपणसुद्धा येऊ शकतं. संयम ठेवा म्हणजे सगळं नीट होईल.

सिंह : या राशीवर सूर्यदेवांची नजर असणार आहे. त्यामुळे मानसिक आणि आर्थिक स्थितीचा करावा लागू शकतो, आर्थिक अडचण प्रकर्षाने जाणवेल. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्यविषयक प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळे या काळात खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रीत करा.

कन्या : मार्च महिन्यात ग्रहांमुळे निर्माण होणारी स्थिती कन्या राशीसाठी अडचणीची ठरेल. आर्थिक संकट ओढावू शकतं. व्यावसायिकांना या काळात तोटा सहन करावा लागेल. तसेच भागीदारीच्या धंद्यात फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ : या राशीच्या लोकांना सुरुवातीचा महिना तसा चांगला जाईल. पण नंतर बदल झालेला दिसून येईल. कामाच्या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्याल. कौटुंबिक वाद या काळात वाढू शकतात.