Astro Tips : काय सांगताय! तुमच्या घरात मोरपिस नाहीत; हे वाचा आणि आजच घरी आणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

peacock feather

Astro Tips : काय सांगताय! तुमच्या घरात मोरपिस नाहीत; हे वाचा आणि आजच घरी आणा

श्री कृष्णाला मोरपीस प्रिय आहेत. कृष्णाचे रूप पूर्ण तेव्हाच होते. जेव्हा त्याच्या मस्तकावर मोरपिस असतो. तसेच आपले घर सुख शांती यांनी परिपूर्ण करायचे असेल तर आपल्या घरातही मोरपीस असणे अत्यतं आवश्यक आहे. बरेचदा घर सजावट करताना आपण मोरपीस ठेवतो. मोरपीस घरात आकर्षक तर दिसतेच पण  ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे खूप फायदेही आहेत. 

हेही वाचा: Navratri 2022 : उपवासासाठी बटाट्याच्या ३ खास रेसिपी, तुम्हीही ट्राय करा

मोरपंख दिसायला जेवढे सुंदर असतात तेवढेच उपयोगीही असतात. मोरपंखाची  खास गोष्ट म्हणजे हे कधीच खराब होत नाहीत. यामध्ये असलेल्या विविध रंगांमुळे हे सूर्यापासून निघालेल्या प्रत्येक उर्जेला ग्रहण करून निगेटिव्हिटी दूर करतात. त्यामुळे आज जाणून घेऊयात मोरपंखाचे फायदे...

हेही वाचा: Navratri 2022: श्री एकवीरा देवी अमरावती मंदिराचा थोडक्यात इतिहास..

1) त्रासदायक शत्रू जाईल दूर 

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल. तर मंगळवारी किंवा शनिवारी मोराच्या पिसावर मारूतीच्या डोक्यावरील शेंदुराने त्या व्यक्तीचे नाव लिहा. रात्रभर ते मोरपिस देव्हाऱ्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात विसर्जित करा. ही प्रक्रिया कोणालाही कळू न देता करा. या उपायाने शत्रूही मित्र बनतो.

2) कालसर्प दोष

कालसर्प दोष होता म्हणूनच श्री कृष्ण कायम आपल्या डोक्यावर मोरपिस लावत होते, असे आपल्या पुराणात लिहीले आहे. यामुळेच, कालसर्प दोष असणाऱ्या लोकांनी ७ मोरपीस आपल्या उशीमध्ये घालून त्यावर झोपावे. 

हेही वाचा: Navratri 2022: देवीला तांबुला का वाहतात?

3) धनप्राप्तीसाठी उपाय

धनप्राप्ती व्हावी यासाठी मोराचे पिस प्रभावीपणे काम करते. देव्हाऱ्यात राधाकृष्णाची मूर्ती ठेवा. त्याबाजूला मोरपंखाची स्थापना करून दररोज त्याची पूजा करा. ४० दिवसांनी ते मोरपीस तूमच्या तिजोरीत पैसे ठेवता तिथे ठेवा. असे केल्याने अनेक दिवसापासूनची उधारी परत मिळेल.

4) ग्रहांचा प्रभाव

ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी त्रासदायक ठरत असलेल्या ग्रहाचे नाव घेत 21 वेळा मंत्राचा जप करून मोराच्या पिसावर पाणी सोडावे. यानंतर ते पूजेच्या ठिकाणी ठेवावे. यामुळे सकारात्मक बदल जाणवू लागतील.मुलांना दृष्ट लागणेनवजात मुलांना लगेच दृष्ट लागते. अशावेळी वाईट नजरेपासून मुलांचा बचाव व्हावा यासाठी मोराचे पंख चांदीच्या ताबीजात घालून त्याच्या उशाखाली ठेवावे. यामुळे भीतीही दूर होईल.