Astro Tips: पायात सोन्याचे दागिने घातल्या मुळे लक्ष्मी देवीचा कोप होतो. गरीबी येऊ शकते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astrology

Astro Tips: पायात सोन्याचे दागिने घातल्या मुळे लक्ष्मी देवीचा कोप होतो. गरीबी येऊ शकते

एकंदरीतच हिंदू धर्मात, परंपरेमध्ये, ज्योतिष शास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सोन्याला खूप महत्त्व आहे. खरतर हेही म्हणायला हरकत नाही की एखादी बाई नटली पण त्यात तिने सोन्याचा दागिना नाही घातला तर तिलाच ते अनेकदा खटकत.  

डोक्यापासून पायापर्यंत लहान मुलांपासून मोठ्या स्त्री पुरुषांपर्यंत सर्वांसाठीच दागिने आपण बघतो. यापैकी काही दागिन्यांमध्ये वैज्ञानिक, धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय कारणेही आपल्याला जुन्या ग्रंथामध्ये सापडतात. पण पायात मात्र सोनं न घालता चांदीच्या वस्तू लोकं घालतात; 

हेही वाचा: Astro Tips : आर्थिक स्थिती मजबूत करायचीय, मग करा या डाळीचा उपाय

पायात सोने घातल्याचे धार्मिक तोटे:

1) सोन्याला एवढं महत्त्व असण्याच कारण म्हणजे भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मी.

2) मुळातच देवी लक्ष्मीला सोने खूप आवडते.

3) धार्मिकदृष्ट्या बघितले तर, लक्ष्मी देवीला आवडणाऱ्या सोन्याला आपल्या पोटाच्या बेंबीपासून खाली कुठेही घातले तर तो तिचा अपमान असतो.

4) ह्याने फक्त लक्ष्मी देविचाच नाही तर भगवान विष्णूंचा कोप होतो. यांची नाराजी आयुष्यात येऊ शकते आणि हे तुम्हाला कंगाल बनवू शकते.  त्यामुळे पायात सोने कधीही घालू नये. 

हेही वाचा: Vastu Tips: शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जायचं आहे? या वास्तू टिप्सचा अवलंब करा

पायात सोने घातल्याचे वैज्ञानिक तोटे:

1) हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पायात सोने धारण केल्याने आरोग्याला हानी पोहोचते. 

2) वास्तविक, मानवी शरीराच्या वरच्या भागाला उबदारपणा आणि खालच्या भागाला थंडपणाची आवश्यकता असते. 

3) सोने शरीरात उष्णता वाढवते, तर चांदी थंडपणा आणते, त्यामुळे पायात सोन्याऐवजी चांदी घातली पाहिजे जेणेकरून शरीरात तापमानाचे योग्य संतुलन राखले जाईल. 

4) अन्यथा, शरीराच्या तापमानातील असंतुलन अनेक प्रकारे नुकसान करू शकते.

टॅग्स :goldlifestyleAstrology