
Astro Tips : महिलांनी आंघोळ न करता करू नये हे काम; होतील हे वाईट परिणाम
महिलांसाठी स्नान करण्याचे नियम
हिंदू धर्मात दररोज सकाळी स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. आंघोळ न करता पूजा करणे, स्वयंपाकघरात जाण्यास देखील मनाई आहे. महिलांना घरची लक्ष्मी म्हणतात. तिला देवीचे रूप मानले गेले आहे, म्हणून हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत. जर घरातील स्त्रीने या नियमांचे पालन केले तर घरात नेहमी सुख-शांती राहते. आज आपण अशाच काही नियमांबद्दल जाणून घेणार आहोत जे महिलांना आंघोळ केल्याशिवाय करणे निषिद्ध आहे. ते न पाळल्यास घरात दारिद्रय येते.

तुळशीला पाणी
महिलांनी आंघोळ केल्याशिवाय कधीही तुळशीला पाणी घालू नये. तुळशीला पूजनीय मानले जाते, त्याला अशुद्ध हातांनी स्पर्श केल्याने किंवा स्नान न करता पाणी घातल्याने लक्ष्मीचा कोप होतो.
स्वयंपाकघरात प्रवेश
महिलांनी आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नये. अन्नातून ऊर्जा मिळते. अशुद्धतेने बनवलेले अन्न नकारात्मकता देते. त्यामुळे महिलांनी आंघोळीनंतर नेहमी अन्न तयार करावे. तसेच आंघोळ न करता अन्न शिजविणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो. तिला लक्ष्मीचे रूप मानले जाते. असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दरिद्रयता येते.


जेवण करु नये
आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये. हाच नियम महिलांसाठीही आहे. आंघोळ न केल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो आणि माणूस आळशी बनतो. आंघोळीने उत्साह येतो आणि मनात चांगले विचार येतात.
केस विंचरणे
काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर केस विंचरण्याची सवय असते, ही सवय महिलांना अजिबात नसावी. शास्त्रानुसार महिलांनी सकाळी लवकर आंघोळ केल्यावरच केसांना कंघी करावी.


पैशाला हात लावू नये
धन हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. आंघोळ न करता पैशाला हात लावल्याने लक्ष्मीचा अपमान होतो आणि तिला राग येतो. यामुळे माणूस गरीब होतो. महिलांनी आंघोळीशिवाय कधीही पैशाला हात लावू नये.