
Saturday Astro Tips : मालामाल व्हायचं आहे? मग याच दिवशी कापा नखं...
Nail Cutting Astro Tips : निरोगी राहण्यासाठी नखे वेळोवेळी कापली पाहिजेत, कारण नाखातली घाण शरीराच्या आत जाऊन माणसाला आजारी पाडते. पण, लोक नखे कापतांना नक्की कधी हे काम करावे याकडे लक्ष देत नाहीत. ज्योतिषशास्त्रात नक्की कधी नखे कापावे याबद्दल सविस्तर माहीती दिली आहे, कधीही उठसूट नखं कापण्यापेक्षा बरोबर दिवशी नखं कापले तर आपल्यावर लक्ष्मी देवींची कृपा होईल आणि लवकरच तुम्ही मालामाल व्हाल.
नक्की कोणत्या दिवशी कापावे नखं ?
सोमवार - शरीराचा संबंध मनाशी असतो. सोमवार हा मनाचा कारक मानला जातो. अशा स्थितीत सोमवारी कोणी नखे कापल्यास तमोगुणापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.
मंगळवार - अनेकजण मंगळवारी नखे कापणे टाळतात. पण, या दिवशी नखे कापल्याने कर्जमुक्त होण्यास मदत होते. त्याचबरोबर कर्जासंदर्भातील वादापासूनही संरक्षण मिळते.
बुधवार - या दिवशी नखे कापल्याने धनप्राप्तीची शक्यता वाढते. जर एखाद्या व्यक्तीने बुधवारी नखे कापली तर त्याच्या बुद्धिमत्तेद्वारे कामात लाभ होतो.
गुरुवार - गुरु हा आध्यात्मिक ग्रह म्हणून ओळखला जातो. यामुळे उपासना आणि अध्यात्माकडे प्रेरणा मिळते. या दिवशी कोणी नखे कापल्यास सत्त्वगुण वाढतात.
शुक्रवार - शुक्र प्रेम आणि कलेशी संबंधित आहे. शुक्रवारी नखे कापल्याने जवळचे मित्र किंवा कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळते. यासाठी तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो.
शनिवार - शनिवार म्हटल्यावर सुट्टीचा दिवस म्हणून लोकं नखं कापतात पण या दिवशी चुकूनही नखे कापू नयेत. यामुळे मन कमकुवत होते आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात.
रविवार - रविवारी सुट्टी असल्याने लोक नखे कापतात. पण, या दिवशी नखे चावणे किंवा कापणे टाळावे.