Bhishma Panchak 2022 : आजपासून सुरू झालं आहे भीष्म पंचक, ५ दिवस काय करू नये, जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhishma Panchak 2022

Bhishma Panchak 2022 : आजपासून सुरू झालं आहे भीष्म पंचक, ५ दिवस काय करू नये, जाणून घ्या

Bhishma Panchak Vrat 2022 : कार्तिकी एकादशी किंवा देवउठनी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा भीष्म पंचक व्रत केलं जातं. असं मानलं जातं की, हे व्रत केल्यानं सर्व पाप कर्मांपासून मुक्ती मिळते. यंदा हे व्रत ४ ते ८ नोव्हेंबर पर्यंत करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात याचं विशेष महत्व आहे.

भीष्म पंचक महत्व

धार्मिक मान्यतांनुसार चांगल्या इच्छांची पूर्ती करणारं हे व्रत आहे. हे व्रत स्वतः श्रीकृष्णाने केलं होतं असं सांगितलं जातं. महाभारताचं युध्द संपल्यावर भीष्म जेंव्हा मृत्यू शैय्येवर होते तेव्हा ते उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहत होते.

हेही वाचा - राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

दरम्यान त्यांनी ५ दिवस राजधर्म, मोक्षधर्म, वर्णधर्म यावर महत्वपूर्ण उपदेश केला. या पाच दिवसांची स्मृती म्हणून हे भीष्मपंचक व्रत केलं जातं. असं म्हणतात की, जे हे व्रत मनापासून करतात त्यांना मोक्षप्राप्ती होते.

काय करावे, काय करू नये

  • पाच दिवस अखंड ज्योत लावावी

  • गीता वाचन करावं.

  • कार्तिक पौर्णिमेला संपूर्ण कुटुंबासह हवन करावं.

  • ब्राह्मण भोजन घालंव

  • गरीबांना यथाशक्ती अन्न, वस्त्र दान करावं.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :mahabharat