Budh Gochar 2026
esakal
ग्रहांच्या हालचालींचा परिणाम सर्व १२ राशींवर होत असतो. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच बुध ग्रह आपली राशी बदलणार आहे. २ डिसेंबर २०२६ रोजी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. बुध ग्रहाला बुद्धी, वाणी, व्यापार आणि तर्कशक्तीचा कारक मानलं जातं. त्यामुळे या गोचराचा परिणाम नोकरी, व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि शिक्षणावर होऊ शकतो. विशेष म्हणजे या बदलाचा पाच राशींना चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.