Budh Vakri 2025: कर्क राशीत बुध वक्री, मेषसह 'या' 6 राशींना नशिबाची मिळेल पूर्ण साथ
Budh Vakri 2025: कर्क राशीत बुध वक्री होणार आहे. पुढील २४ दिवस बुध वक्री होत असताना सर्व राशींवर परिणाम होणार आहे. १८ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत बुध वक्री राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा तो उग्र होतो. काही राशींवर त्याचा शुभ प्रभाव पडतो. बुधाच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे हे जाणून घेऊया.