Last day of the year : वर्षाच्या शेवटच्या शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेव होतील प्रसन्न... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hanuman

Last day of the year : वर्षाच्या शेवटच्या शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेव होतील प्रसन्न...

Hanuman: शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. पण तरीही या दिवशी हनुमानाची  पूजा केली जाते. असे मानले जाते की शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि यामुळे भक्तांचे शनिशी संबंधित सर्व त्रास दूर होतात. शनिवारी  हनुमानाच्या पूजेमागे एक पौराणिक कथा सांगितली जाते.शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. पण तरीही या दिवशी हनुमानाची पूजा केली जाते. असे मानले जाते की शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात आणि यामुळे भक्तांचे शनिशी संबंधित सर्व त्रास दूर होतात. शनिवारी हनुमानाच्या पूजेमागे एक पौराणिक कथा सांगितली जाते, ज्यामध्ये शनिदेवाने हनुमानाला वचन दिले होते की जो कोणी हनुमानाची पूजा करेल, तो त्याला कधीही त्रास देणार नाही.

हनुमानाची आणि शनिदेवाची ही कथा त्रेतायुगातील रामायण काळाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार, रामाची आज्ञा मिळाल्यावर हनुमान सीतामातेचा शोध घेत लंकेत पोहोचतात, तेव्हा त्यांनी पाहिले की शनिदेवाला रावणाने कैद करून ठेवले होते आणि त्याला उलटे टांगले होते. शनिदेवाची ही अवस्था पाहून हनुमानाने त्यांना रावणाच्या कैदेतून मुक्त केले. हनुमानाच्या या मदतीमुळे प्रसन्न होऊन शनिदेवाने हनुमानाला वरदान मागायला सांगितले.

तेव्हा हनुमान म्हणाले की, आजपासून जो कोणी भक्त शनिवारी माझी पूजा करेल, त्याला तुम्ही कधीही त्रास देणार नाहीत. हे वचन शनिदेवाने मान्य केले. तेव्हापासून हनुमानाची शनिवारी पूजा केली जाते. शनिवारी हनुमानाची पूजा करणाऱ्यावर शनिदेवाची कृपाही राहते असे म्हणतात. जर शनिदेव तुमच्या कुंडलीत भारी असेल शनि सदेशती, धैय्या किंवा महादशा यांमुळे तुम्ही त्रासलेले असाल तर शनिवारी हनुमानाची पूजा करावी. हनुमानाची पूजा करून या सर्व संकटांपासून मुक्ती मिळू शकते.

हेही वाचा: Winter Recipe: टेस्टी अन हेल्दी अननसाचा शिरा कसा तयार करायचा?

ही पूजा कशी करावी ?

● शनिवारी स्नान केल्यानंतर मंदिरात जाऊन तांब्याच्या भांड्यात पाणी आणि सेंदूर मिसळून हनुमानजींना अर्पण करा. यानंतर त्यांना गूळ, हरभरा आणि केळी अर्पण करा. त्यांच्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

● हनुमान जी ‘श्री हनुमंते नमः’ मंत्राचा जप करा. हनुमान चालिसा वाचा. असे केल्याने हनुमानजी आणि शनिदेव दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो.

हेही वाचा: Winter Health Tips: हिवाळ्यात आरोग्यवर्धक कुळीथ खाण्याचे फायदे...

● न्यायप्रिय शनिदेव खूप कृपाळू आहेत. जे भक्त त्यांची आराधना करतात त्यांच्यावर शनिदेव कृपा करतात.

● तुम्हाला शनीची साडेसाती किंवा इतर शनिदोष असेल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाला दोन्ही हाताने स्पर्श करत पिंपळाच्या झाडाला सात परिक्रमा घाला. दर शनिवारी हा उपाय केल्यास अधिक चांगले फळ प्राप्त होते. 

● शनिवार हा भगवान शनिदेव आणि हनुमानजींना समर्पित असल्याने या दिवाशी दोन्ही देवांची एकासना ( एकत्र उपासना) करावी. एकासना सोडण्यापूर्वी एक पोळी स्वच्छ प्लेटमध्ये घेत तुमच्या समोर ठेवा. त्यानंतर मनोकामना करावी.

● मनोकामना केल्यानंतर ती पोळी कुत्र्याला किंवा काळ्या गाईला खाऊ घाला. हा उपाय केल्याने रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल.

टॅग्स :cultureHanumanHistory