Winter Health Tips: हिवाळ्यात आरोग्यवर्धक कुळीथ खाण्याचे फायदे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Horse gram

Winter Health Tips: हिवाळ्यात आरोग्यवर्धक कुळीथ खाण्याचे फायदे...

Horse gram: कुळीथ’ म्हणजे काही ठिकाणच्या बोली भाषेत ‘हुलगा’ हे भारतात सगळेकडे पिकणारे आणि सहज उपलब्ध असणारे असे कडधान्य आहे. हे कडधान्य इतके पौष्टिक आहे की त्याला सुपर फूड मानले जाते. कोकणात कुळीथ फार प्रसिद्ध आहे.भात शेती झाल्यानंतर तिथे कुळीथ पीक घेतले जाते. कोकणात कुळीथचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यात होतो.

चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊ या हिवाळ्यात आरोग्यवर्धक कुळीथ खाण्याचे काय काय फायदे आहेत याविषयीची सविस्तर माहिती..

1) कुळीथ डाळीचे दररोज सेवन केल्याने मुतखड्याची समस्या दूर होते, त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी मुबलक प्रमाणात आढळते, तर ते शरीरातील दुर्गधीची समस्या दूर करण्यास देखील फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. 

2) एखादा मधुमेहाचा रुग्ण असेल आणि त्याला त्यावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर कुळीथ डाळीचे सेवन करणे त्याच्यासाठी खूप फायदेशीर आहे, यामध्ये व्हिटॅमिनसह प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. 

3) जर तुम्हाला अधिक फायदे हवे असतील तर तुम्ही त्याचा आहारात संध्याकाळी स्नॅक म्हणून देखील समावेश करू शकता, कारण हुलगा खूप आरोग्यदायी आहे. 

4) जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कुळीथ डाळीचे सेवन करणे तुमच्यासाठी खुप फायदेशीर ठरू शकते, वजन कमी करण्यासाठी कुळीथ खूप फायदेशीर मानले जाते, यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. कॅलरीजचे प्रमाणही कमी असते.

5) कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवायचे असेल, तर कुळीथ डाळीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. हायपोकोलेस्टेरोलेमिक नावाचा घटक आढळतो, जो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्याच वेळी, यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, तसेच त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. या आधारावर असे म्हणता येईल की, जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल, तर तुम्ही रोजच्या आहारात कुलथीच्या डाळीचा समावेश करू शकता.

6) खूप कफ असलेला खोकला, दमा या विकारात कुळथाचा काढा उपयोगी आहे. गंडमाळा, मूळव्याध, शुद्ध आमवात, यकृत, प्लीहेची सूज या विकारात कुळथाचा काढा उपयुक्त आहे.

7) रक्ती मूळव्याध, आप्लपित्त विकार असलेल्यांनी कुळीथ खाऊ नये तसेच रक्तविकार असलेल्या व्यक्तींनी शक्यतो कुळीथ खाणे टाळावे.