Chandra Grahan : सावधान! चंद्रग्रहणाचा 'या' पाच राशींवर अशुभ प्रभाव, तुमची रास यात आहे का?

छायाकल्प ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत असे सांगितले जात असले तरी काही राशींवर याचा दुष्परीणाम मात्र दिसून येणार आहे.
Chandra Grahan
Chandra Grahansakal

Chandra Grahan : वैशाख पौर्णिमा म्हणजेच आज होणारे चंद्रग्रहण हे ‘छायाकल्प’ स्वरुपाचे असणार आहे. छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र बिंबास प्रत्यक्ष ग्रहण न लागता चंद्रबिंब फक्त पृथ्वीच्या अंधुक, अस्पष्ट व धूसर छायेत प्रवेश करत असते. हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतात दिसणार असून इतर देशातही ‘छायाकल्प’ स्वरुपातच दिसणार आहे.

छायाकल्प ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत असे सांगितले जात असले तरी काही राशींवर याचा दुष्परीणाम मात्र दिसून येणार आहे. पाच राशींवर या चंद्रग्रहणाचा अशुभ परिणाम होणार आहे. तुमची रास यात आहे का, जाणून घ्या. (Chandra Grahan 2023 astrology horoscope lunar eclipse negative impact on people having these zodiac signs )

मेष राशी

मेष राशींवर चंद्रग्रहणाचा अशुभ परिणाम दिसून येणार. या राशींनी विशेष काळजी घेणे, गरजेचे आहे. मेष राशींच्या जीवनात ताण तणाव वाढू शकतो. वैयक्तिक जीवनात समस्यांचा भडीमार होऊ शकतो तर व्यावसायिक जीवनातही अडचणी वाढू शकता. जोडीदारासोबत वाद वाढू शकतो. याशिवाय आरोग्यावरही परीणाम पडू शकतो.

वृषभ राशी

वृषभ राशींसाठी हे चंद्रग्रहण उत्तम नाही. या राशींच्या लोकांनी महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे. वाद, रागामुळे अनेक गोष्टी बिघडतील. आरोग्याच्या समस्या जाणवतील. गृहक्लेष होण्याची दाट शक्यता आहे. खर्च वाढणार याशिवाय मानसिक ताण तणावही वाढेल.

Chandra Grahan
Chandra Grahan 2023 : देशातलं पहिलंच ग्रहण कसं व कधी पाहाल? जाणून घ्या...

कर्क राशी

कर्क राशीचे लोकांनी या काळात संयमी राहणे आवश्यक आहे. कर्क राशीचे लोकांचे काम बिघडू शकते ज्यामुळे तुम्हाला मनस्ताप होणार. अडचणी वाढणार. मार्गात अडथळे निर्माण होणार. या राशींच्या लोकांनी वाद घालू नये नाहीतर गोष्ट बिघडेल.

कन्या राशी

कन्या राशींच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या काळात आर्थिक व्यव्हार टाळावे. या राशींसाठी चंद्रग्रहण फायदेशीर नाही. समस्यांचा भडीमार होऊ शकतो. स्वत:ला सावरणे गरजेचे आहे. कुटूंबात आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या जाणवतील. प्रवास टाळावा.

Chandra Grahan
Chandra Grahan 2023 : वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण उद्या, या मंत्रांचा जप करा; दोष अन् रोगराई दूर होईल

वृश्चिक राशी

वृश्चिक राशींच्या लोकांनी या चंद्रग्रहणाच्या काळात सावध राहण्याची गरज आहे. या काळात त्यांनी स्वत:ला सावरणे गरजेचे आहे. आरोग्याच्या समस्या जाणवतील. कुटूंब, नोकरी, आणि व्यवसायात अडचणी जाणवतील. धार्मिक कार्य करा. सहनशीलता ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com