
Chaturmas religious tips for positivity and peace: हिंदू धर्मात चातुर्मासाला खूप महत्त्व आहे. आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच देवउठनी एकादशीपर्यंत चालू राहतो. यंदा ६ जुलै म्हणेजच आजपासून चातुर्मास सुरु झाला आहे. या काळात भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रामध्ये जातात आणि असे मानले जाते की या काळात विवाह, गृहप्रवेश इत्यादी शुभ कामे केली जात नाहीत. चातुर्मास हा काळ आध्यात्मिक साधना आणि उपासनेसाठी खूप महत्वाचा मानला जातो. म्हणून या वेळेचे वाईट परिणाम टाळण्यासाठी आणि श्री हरीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी रात्री पुढील उपाय करावे.