वार्षिक राशिभविष्य | धनू - नावलौकिक मिळेल; प्रगती होईल

Yearly Horoscope
Yearly Horoscope sakal

वाईटातूनही चांगले करणारी, शून्यातून नवे जग उभारणारी, कचऱ्‍यातून सोनं निर्माण करणारी, कर्तबगार, सर्व क्षेत्रांत श्रेष्ठत्व गाजवणारी, प्रसिद्धी व मानसन्मानाची अपेक्षा असणारी व स्वतःच्या कर्तृत्वावर वर येणारी अशी ही धनू रास आहे. मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा अशा तीन महत्त्वाच्या नक्षत्रांचे स्वामित्व असलेली ही रास आहे. आपल्या पूर्वजन्मातील संचितानुसार त्याचे योग्य फळ योग्य वेळी मिळेल. त्यासाठी परमेश्वराला दोष देऊ नका, अशी शिकवण ही रास देते. भाग्यस्थानाच्या मालकीची ही रास आहे. स्वतःच्या चिकाटीने व जिद्दीने प्रगती करून घेणे, हे या राशीचे वैशिष्ट्य आहे. करारी व धाडसी, बुद्धिमान असल्याने या राशीचे लोक इतर लोकांवर छाप पाडतील.

एक वेळ देव माफ करेल; पण कर्म कधीही माफ करणार नाही. चांगले-वाईट जे काही कराल, त्याचे फळ आज ना उद्या, या जन्मात अथवा पुढील जन्मात निश्चितच मिळणार, हे शिकवणारी ही रास आहे. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ गीतेतील या श्लोकाचा व्यावहारिक अर्थ सांगणारी ही रास आहे. माणसाने सतत कर्म करीत राहावे. आपल्या पूर्वजन्मातील संचितानुसार त्याचे योग्य फळ योग्य वेळी मिळेल. त्यासाठी परमेश्वराला दोष देऊ नका, अशी शिकवण ही रास देते. भाग्यस्थानाच्या मालकीची ही रास आहे. आपला भाग्योदय कधी होणार, पैसा कसा मिळेल, कोणत्या मार्गाने गेल्यास जीवनात उत्कर्ष होईल, हे सांगणारी ही रास आहे. वाईटातूनही चांगले करणारी, शून्यातून नवे जग उभारणारी, कचऱ्‍यातून सोने निर्माण करणारी, कर्तबगार, सर्व क्षेत्रांत श्रेष्ठत्व गाजवणारी, प्रसिद्धी व मानसन्मानाची अपेक्षा असणारी व स्वतःच्या कर्तृत्वावर वर येणारी अशी ही धनू रास आहे. मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा अशा तीन महत्त्वाच्या नक्षत्रांचे स्वामित्व असलेली ही रास आहे.

या वर्षी गुरू एप्रिलपर्यंत तृतीय स्थानात आहे. अपेक्षेप्रमाणे धन मिळणार नाही; पण नेहमीच्या गरजा भागतील. वाहन-गाडी, घरदार सर्व काही घेऊ शकाल. काही वेळा पैशासाठी नको ती कामे करण्याचा प्रयत्न कराल. एप्रिलनंतर बलवान अवस्थेत चतुर्थात येणारा गुरू शुभ आहे. सर्व कामांत मोठे यश देईल. घरदार, गाडी, बंगला, वाहन होण्याच्या दृष्टीने अनुकूलता लाभेल. वडिलोपार्जित इस्टेट असेल तर ती मिळविण्यासाठी प्रयत्न करा. नावलौकिक आणि कीर्ती यास उत्तम. कोर्ट प्रकरणे असतील, तर योग्य मार्गाने ती हाताळण्याचा प्रयत्न करा. शनि धनस्थानी राहणार आहे. सर्व प्रकारे शुभ फळ देईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. घर अथवा जागा घेण्याचा प्रयत्न करा, यश मिळेल.

राहू मार्चपर्यंत सहावा असून, तो तुम्हाला सर्व बाबतीत मोठे यश देणार आहे. शत्रू थंड पडतील; पण आरोग्याच्या तक्रारी मात्र जाणवतील. या गुरूच्या कालखंडात कोणतीही व्यसने चुकूनही करू नका. त्यानंतर राहू पूर्ण वर्षभर पंचमात राहणार आहे. सरकारी कामकाजात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात अधिकारपद किंवा एखादे मानाचे पद मिळू शकेल. संततीच्या बाबतीत मात्र अनिष्ट योग. विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे; अन्यथा राहू नको ते प्रकार घडवेल. या राहूमुळे पूर्वजांचे काही दोष दृश्यमान होतील. त्यासाठी शिवआराधना केल्यास उत्तम फळ मिळेल.

हर्षल पूर्ण वर्षभर पंचमात राहील. गुप्त कटकारस्थान, विश्वासघात, प्रक्षोभक लिखाण, इतरांच्या भांडणात मध्यस्थी यापासून दूर राहा. जनकल्याणाची काही कामे केल्याने लोकांची सतत तुमच्याकडे रीघ लागेल. नेपच्यून वर्षभर तृतीयस्थानी राहणार आहे. स्फूर्तिदायी लिखाण कराल. उच्च ध्येय बाळगल्याने सामाजिक मानसन्मान मिळेल. काही भाग्यवंतांना जलप्रवास योग. प्लूटो धनस्थानी आहे. राजकारणात प्रवेश करण्याचा योग. तशी संधी मिळाल्यास जरूर जा. त्याचा आर्थिकदृष्ट्या निश्चित फायदा होईल. नावलौकिकही मिळेल. यावर्षी तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या घटना घडणार आहेत, त्यात दैवी शक्तींचा वरदहस्त असेल. पैसा तुमच्या मागे धावत येईल. जर एखादा नवीन मोठा उद्योग-व्यवसाय सुरू करणार असाल तर तो जोरात चालेल. पूर्वी जर एखादा व्यवसाय बंद पडला असेल तर तो सुरू करण्यास हरकत नाही. त्यात चांगली प्रगती होईल. सरकारदरबारी मानसन्मान मिळेल. स्वतंत्र विचारसरणीमुळे काही जण तुमचे शत्रू होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायात काही नव्या गोष्टींचे उत्पादन करा. त्यातून बराच फायदा होईल. नोकरी-व्यवसायात ध्यानीमनी नसताना अचानक महत्त्वाचे फेरफार घडतील. काही जणांना वंशपरंपरेने मोठे धन मिळू शकते. राजासारखा मानसन्मान मिळेल. प्रापंचिक जीवन सुखी राहील. स्वकष्टाने कमाई कराल, त्यात सतत वाढ होत राहील. एकंदरीत यावर्षीचे ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे असेल.

मासिक फलाफल -

  • जानेवारी - मूळ, पूर्वाषाढा नक्षत्र असणाऱ्यांना वर्षभर वस्त्रप्रावरणांचा लाभ होत राहील; तर उत्तराषाढा प्रथम चरण असलेल्या व्यक्तींना आर्थिक हानीचे योग. असे या वर्षीच्या संक्रांतीचे फळ आहे. याचा अनुभव वर्षभर येत राहील.

  • फेब्रुवारी - नोकरी-व्यवसायात अथवा समाजात तुमच्या चांगल्या कामांची नोंद घेतली जाईल. त्यामुळे नवीन ऑर्डरी मिळतील. कामाचा ताण वाढेल. एकाच वेळी अनेक पाहुणे मंडळी घरी आल्याने आर्थिक बजेट कोलमडेल. मोठे खर्च, आरोग्याच्या तक्रारी, अपघात अथवा भांडणे यातून मनस्ताप होईल.

  • मार्च - स्वतःला कुणी कितीही शहाणे समजले, तरी संकटे काही सांगून येत नसतात. ग्रहांचा हा संदेश लक्षात ठेवून वागणे आवश्यक आहे. मंगळ-शनिसह चार ग्रह धनस्थानी, त्यामुळे खर्च वाढतील. काही ठिकाणी कठोर बोलण्यामुळे संबंध तुटण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीचा काही जण गैरफायदा घेतील. कुणाशीही बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्या.

  • एप्रिल - या महिन्यात ग्रहमान सरकारी कामकाज करण्यास उत्तम आहे. गुरु-शुक्राच्या उत्तम सहकार्यामुळे जागा, वाहन, घरदार खरेदी-विक्री यासाठी अनुकूल काळ आहे. धनलाभ, प्रवास, शिक्षणात यश, विवाहकार्य, एखाद्या उद्योगाचा पाया घालणे इत्यादी कामे करता येतील.

  • मे - शुक्र, राहू, हर्षल योग विचित्र आहे. कोणतेही काम जपून करावे. एखाद्याला मदत करायला जाऊन नको त्या प्रकरणात अडकाल, सावध राहा. वास्तूसंदर्भातील वाद-विवादांपासून दूर राहा. कायदेशीर प्रकरणात अडकू नका. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता.

  • जून - देवीकृपा दर्शविणारे ग्रहमान आहे. अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होत जातील. मन प्रसन्न राहील. प्रकृतीकडे लक्ष द्या. आर्थिक भरभराट होऊ शकते; पण ऐषआरामी व चैनीच्या वस्तूसाठी खर्च वाढतील. गुरु-शुक्राचे भ्रमण अनेक बाबतीत फायदेशीर आहे.

  • जुलै - दुर्दम्य आत्मविश्वास, सचोटी, कष्ट तसेच आशावादी व निरपेक्ष भावनेने केलेले कोणतेही काम यशस्वी होते, याचा अनुभव येईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेकांकडून ऑफर येतील. कामाच्या व्यापात प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरेल. वैवाहिक जीवनात कोणतेही व्यवहार एकमेकांना विश्वासात घेऊन करावेत. त्यामुळे दुप्पट यश मिळेल.

  • ऑगस्ट - बुध-रविच्या सहकार्यामुळे अनेक समस्या मार्गी लागतील. नातेवाईक व मित्रमंडळी चांगले वागू लागतील. कुठेही अतिउत्साह दाखवू नका. राहू-हर्षलचे भ्रमण परदेश प्रवास, शिक्षण, आर्थिक बाबतीत उत्तम आहे.

  • सप्टेंबर - कायदेशीर भागीदारी असेल तर त्याचा फायदा होईल. रागावून, रुसून अथवा काही कारणाने घरातून गेलेल्या व्यक्ती परत येतील. आर्थिक अडचणी दूर होतील. चांगल्या नोकरीचे कॉल येतील.

  • ऑक्टोबर - लक्ष्मीची कृपा दर्शविणारे ग्रहमान आहे. अचानक लाभ होतील. त्याचबरोबर गैरसमज, एकीकडे प्रशंसा आणि दुसरीकडे टीका असे विचित्र अनुभव येतील. शाळा-महाविद्यालय अथवा नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. मात्र, महत्त्वाचे पत्रव्यवहार करताना काळजी घ्या. कुणाच्या किमती वस्तू ठेवून घेऊ नका. घाईगडबडीत व्यवहार करताना चुका होऊ देऊ नका; अन्यथा आर्थिक फटका बसेल.

  • नोव्हेंबर - काही महत्त्वाचे व्यवहार पूर्ण होतील. रवि-केतू योग चांगला नाही. कुणीतरी मुद्दाम खुसपट काढून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे कुणाशीही बोलताना जपून राहणे आवश्यक आहे.

  • डिसेंबर - जागेचे व्यवहार पूर्ण होऊ शकतात. मंगळ-केतूच्या अशुभ योगामुळे खर्चात वाढ होईल. तुमची प्रगती काही जणांना बघवणार नाही. त्यामुळे ते मागून टीका करीत राहतील; पण त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com