Numerology for Kids: Is Your Child Too Stubborn?
esakal
Child's Stubborn Nature & Birth Date: प्रत्येक पालकाची आपल्या मुलांच्या संगोपनाबाबत एकच तक्रार असते, ती म्हणजे 'माझे मूल खूप हट्टी आहे, ते ऐकतच नाही!' पण, अंकशास्त्रानुसार (Numerology) मुलांच्या या अति-हट्टी स्वभावामागे त्यांची जन्म तारीख म्हणजेच त्यांचा 'मूलांक' कारणीभूत असू शकतो. कोणत्याही महिन्याच्या विशिष्ट तारखेला जन्मलेल्या मुलांवर विशिष्ट ग्रहांचा प्रभाव असतो. हा ग्रहप्रभाव मुलांचे व्यक्तिमत्त्व, विचारसरणी, कामाची पद्धत आणि त्यांचा स्वभाव ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
अंकशास्त्रानुसार १, ३ आणि ९ या मूलांकांची मुले स्वभावाने प्रचंड जिद्दी आणि स्वतःचे म्हणणे खरे करणारी असतात. या मुलांचा हट्टीपणा नेमका कसा असतो आणि त्यामागे कोणते ग्रह काम करतात, याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-