
बाप्पाचं आगमन होताच सगळं वातावरण आज गणेशमय झालं आहे. गणेश चतुर्थीच्या या शुभ पर्वावर काही राशींमध्ये आज भारी योग आहे. या शुभ मुहूर्तावर काही राशींमध्ये आज भारी योग आहे. जाणूण घ्या कोणत्या राशींमध्ये आहे आज भारी योग.
मेष - या राशींच्या दाम्पत्यांमध्ये आज शुभ योग असून त्यांच्या नात्यातला गोडवा वाढेल. व्यापार सुरळीत होईल. नेतृत्व क्षमता वाढेल. ध्येयाप्रतीसाठी एकनिष्ठ राहील. जवळच्या लोकांचा विश्वास वाढेल. विभिन्न कार्यामध्ये यश मिळेल.
वृषभ - तुमच्या व्यापारामध्ये ढिल देऊ नका. तुमच्या व्यवसायिक चर्चा वाढतील. लेण्यादेण्यात चोख राहा. उधारी टाळा. नोकरीमधला परफॉर्मंस चांगला राहिल. जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडेल.
मिथुन - कामाच्या परिस्थितीमध्ये बदल होईल. आज तुमचा परफॉर्मंस चांगला राहील. परीक्षा स्पर्धेत तुमचा प्रभाव असेल. मित्रमंडळींशी समंजसपणा वाढेल. सक्रियता वाढेल. आत्मविश्वास वाढेल. बुद्धिमत्ता वाढेल.
कर्क - भावनात्मक विषयात नम्रता ठेवा. कौटुंबिक गोष्टींमध्ये धैर्याने काम घ्या. घरातील लोकांशी जवळीक वाढेल. कामावर फोकस राहील.
सिंह - महत्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. संवाद सुधारेल. सामुहिक कार्यात तुमच्या उत्साह वाढेल. आळस टाळा.
कन्या - पाहुण्यांचा आदर सत्कार करा. तुमच्या व्यवहाराने सगळे प्रभावित होतील. शुभ संकेत मिळतील. वचन पाळण्यात पुढे राहाल. इच्छुक वस्तू प्राप्त होईल.
तूळ - विभिन्न कार्यात यश मिळेल. करियर आणि व्यापारात सातत्य ठेवा.
वृश्चिक - यादी बनवून कार्य कराल. नातलगांचं समर्थन मिळेल. खर्च वाढेल. बजेटकडे लक्ष द्याल.
धनू - सगळ्यांचा विश्वास जिंकाल. धैर्य मिळेल. चर्चेत प्रभावी राहाल. व्यापारासाठी दिवस शुभ ठरेल.
मकर - अनुभवी लोकांचा पाठिंबा मिळेल. सगळ्यांच्या मदतीचं फळ मिळेल. व्यापारात लाभ होईल. मोठे स्वप्न बघाल.
कुंभ - तब्येतीत सुधार होईल. आनंनदायी गोष्ट कळेल. जनकल्याणाचे काम कराल. आस्था आणि विश्वास वाढेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्याशी जोडले जाल. घरसंबंधांमध्ये सुधार होईल.
मीन - आवश्यक कार्यामध्ये धैर्य दाखवा. व्यवस्थेत नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या बाबतित सावध राहा. गैरजबाबदारीने वागणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.