Panchang 14th sept: या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२९ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Daily Panchang
Daily PanchangSakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १४ सप्टेंबर २०२२ (daily panchang 14 september 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद २३ शके १९४४

आज सूर्योदय ०६:२५ वाजता तर सूर्यास्त १८:३४ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही २१:२९ वाजता होणार. आज प्रात: संध्या ही स.०५:१४ ते स.०६:२५ दरम्यान असणार. आज सायं संध्या ही १८:३४ ते १९:४५ दरम्यान असणार. आज अपराण्हकाळ हा १३:४३ ते १६:०९ दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ हा १८:३४ ते २०:५६ दरम्यान असणार. आज निशीथ काळ हा २४:०७ ते २४:५४ दरम्यान असणार. आज राहु काळ हा १२:३० ते १४:०१ दरम्यान असणार. आज यमघंट काळ हा ०७:५७ ते ०९:२८ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी ही पंचमी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२९ ते दु.१२:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे या दिवशी मुळा खावू नये. या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १७:०३ ते १८:३४

  • अमृत मुहूर्त -  ०७:५७ ते ०९:२८

  • विजय मुहूर्त - १४:३२ ते १५:२१

पृथ्वीवर अग्निवास १२:११ प. मंगळ मुखात आहुती आहे. शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - चतुर्थी(१२:११ प.नं. पंचमी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - अश्विनी(०९:४५ प.नं.भरणी)

  • योग - ध्रुव(०९:५७ प.नं.व्याघात)

  • करण - बालव(१२:११ प.नं. कौलव)

  • चंद्र रास - मेष

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मीन

Daily Panchang
Shravan 2022 : रिसोड येथील श्री सिद्धेश्वर संस्थान

विशेष:- पंचमी श्राद्ध, भरणी श्राद्ध (गया श्राद्ध फलप्राप्ती साठी), सूर्याचा उत्तराफाल्गुनी नक्षत्र प्रवेश १२:४९

या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. विष्णूंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com