Panchang 19 August 2022: जन्माष्टमीला करा 'या' मंत्राचा 108 वेळा जप

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५४ ते दु.०३:३४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang in MarathiSakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १९ ॲागस्ट २०२२ (daily panchang 19 august 2022 )

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण २८ शके १९४४

आज सूर्योदय ०६:२० वाजता होणार तर सूर्यास्त १८:५६ वाजता होणार. आज चंद्रोदय २४:१५ वाजता होणार. आज प्रात: संध्या ही स.०५:११ ते स.०६:२० दरम्यान असणार. आज सायं संध्या ही १८:५६ ते २०:०५ दरम्यान असणार. आज अपराण्हकाळ हा १३:५४ ते १६:२५ दरम्यान असणार तर प्रदोषकाळ हा १८:५६ ते २१:१३ दरम्यान असणार. आज निशीथ काळ हा २४:१६ ते २५:०१ दरम्यान असणार

आज राहु काळ हा ११:०४ ते १२:३८ दरम्यान असणार तर यमघंट काळ हा १५:४७ ते १७:२१ दरम्यान असणार. आज श्राद्धतिथी ही  अष्टमी श्राद्ध असणार. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५४ ते दु.०३:३४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे या दिवशी नारळ खावू नये.या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Third Shravan Somvar 2021: शिवामूठ तिसरा श्रावणी सोमवार

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - ०७:५५ ते ०९:२९

  • अमृत मुहूर्त - ०९:२९ ते ११:०४

  • विजय मुहूर्त - १४:४४ ते १५:३४

  • पृथ्वीवर अग्निवास २४:५७ नं.

  • गुरू मुखात आहुती आहे.

  • शिववास गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - श्रावण

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - अष्टमी(२४:५७ प.नं.नवमी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - कृत्तिका(२८:४५ प.नं.रोहिणी)

  • योग - ध्रुव(२४:५२ प.नं.व्याघात)

  • करण - बालव(१२:३२ प.नं. कौलव)

  • चंद्र रास - मेष (०९:३३ नं.वृषभ)

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मीन

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Shravan 2022 : त्र्यंबकला असेल कडेकोट पोलिस बंदोबस्त

विशेष:- कालाष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत(उपवास), श्रीकृष्ण नवरात्र समाप्ती, श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती, श्री पंत बाळेकुंद्री महाराज जयंती, मन्वादि, कौमारीदेवीपूजा, जिवती पूजन

या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे. श्रीकृष्णाष्टक स्तोत्राचे पठण करावे. ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. श्रीकृष्णांना लोणी साखरेचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी. दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना साखर खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना स.०९:३३ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com