पंचांग 1 मे: या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे | Daily Panchang | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang
पंचांग 1 मे: या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे | Daily Panchang

पंचांग 1 मे: या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १ मे २०२२ (Daily Panchang 1st May, 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ११ शके १९४४

 • सूर्योदय -०६:११

 • सूर्यास्त -१८:५३

 • चंद्रोदय -०६:२१

 • प्रात: संध्या - स.०५:०३ ते स.०६:११

 • सायं संध्या -  १८:५३ ते २०:००

 • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२०

 • प्रदोषकाळ - १८:५३ ते २१:०८

 • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५४

 • राहु काळ - १७:१७ ते १८:५३

 • यमघंट काळ - १२:३२ ते १४:०७

 • श्राद्धतिथी -  प्रतिपदा श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:०८ ते दु.०२:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

 • या दिवशी कोहळा खावू नये.

 • या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

लाभदायक-

 • लाभ मुहूर्त-- ०९:२१ ते १०:५७

 • अमृत मुहूर्त-- १०:५७ ते १२:३२

 • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:२९

 • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

 • रवि मुखात आहुती आहे.

 • शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

 • शालिवाहन शके -१९४४

 • संवत्सर - शुभकृत्

 • अयन - उत्तरायण

 • ऋतु - वसंत(सौर)

 • मास - वैशाख

 • पक्ष - शुक्ल

 • तिथी - प्रतिपदा(२६:१९ प.नं.द्वितीया)

 • वार - रविवार

 • नक्षत्र - भरणी(२१:३० प.नं.कृत्तिका)

 • योग - आयुष्मान(१४:५९ प.नं. सौभाग्य)

 • करण - किंस्तुघ्न(१३:५० प.नं. बव)

 • चंद्र रास - मेष (२७:५५ नं. वृषभ)

 • सूर्य रास - मेष

 • गुरु रास - मीन

विशेष:- वैशाख मासारंभ, वैशाखात रोज तुळस पूजन करणे, पिंपळाला पाणी घालणे, नक्तव्रतारंभ, पाणपोई दान करणे, देवास संततधार ठेवणे, महर्षी पराशर जयंती, दर्शेष्टि, महाराष्ट्र-कामगार दिन, दग्धयोग २१:३० प.

 • या दिवशी पाण्यात मंजिष्ठ वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

 • त्रैलोक्यमंगल सूर्य कवच स्तोत्राचे पठण करावे.

 • ‘ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

 • सूर्यदेवास केशरभाताचा नैवेद्य दाखवावा.

 • सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

 • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

टॅग्स :SanskrutiPanchang