आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 एप्रिल 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang

पंचांग - शनिवार : चैत्र कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आश्विानी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय स. ६.२०, चंद्रास्त सायं. ६.३६, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ६.५४, दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती उ. रा. १.५८, भारतीय सौर वैशाख १० शके १९४४.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 एप्रिल 2022

पंचांग -

शनिवार : चैत्र कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आश्विानी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय स. ६.२०, चंद्रास्त सायं. ६.३६, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ६.५४, दर्श अमावास्या, अमावास्या समाप्ती उ. रा. १.५८, भारतीय सौर वैशाख १० शके १९४४.

दिनविशेष -

१९९५ - पुणे येथील टाटा मूलभूत संशोधन केंद्राच्या राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रातील (एनसीआरए) संशोधक डॉ. कंदस्वामी सुब्रह्मण्यम यांना पदार्थविज्ञानातील बी. एम. बिर्ला विज्ञान पुरस्कार जाहीर.

२०११ - भारताच्या मुलींनी जागतिक युवा आणि कुमारी मुष्टियुद्ध स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करताना अंताल्या (तुर्कस्तान) येथे चार सुवर्णपदके जिंकली. सरजूबाला देवी (४८ किलो) आणि मीनू बासुमातारी (६४ किलो) यांनी युवा गटात भारताची शान उंचावली. कुमारी गटात निखत झरीन हिने ५० किलो गटात आणि लालेनकौली हिने ४६ किलो गटात बाजी मारत भारताची ताकद दाखवून दिली. लाल्फकझुवलीने (५२ किलो) रौप्यपदक पटकावले.

२०१२ - पुणे विद्यापीठात नॅशनल लॉ स्कूल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. अशा प्रकारचे लॉ स्कूल सुरू करणारे पुणे विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे.

२०१५ - महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्रभूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला.

Web Title: On This Day Happened Today Panchang History In Marathi 30 April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :marathiAstrologyPanchang
go to top