Panchang 22 November: लाल वस्त्र परिधान करावे; या वेळेत काम केल्यास कार्यसिद्धी होईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang 22 November: लाल वस्त्र परिधान करावे; या वेळेत काम केल्यास कार्यसिद्धी होईल

Panchang 22 November: लाल वस्त्र परिधान करावे; या वेळेत काम केल्यास कार्यसिद्धी होईल

२२ नोव्हेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण १ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:४९

☀ सूर्यास्त -१७:५२

🌞 चंद्रोदय - २९:५३

⭐ प्रात: संध्या - स.०५:३१ ते स.०६:४९

⭐ सायं संध्या -  १७:५२ ते १९:१०

⭐ अपराण्हकाळ - १३:२७ ते १५:४०

⭐ प्रदोषकाळ - १७:५२ ते २०:२८

⭐ निशीथ काळ - २३:५५ ते २४:४७

⭐ राहु काळ - १५:०७ ते १६:२९

⭐ यमघंट काळ - ०९:३५ ते १०:५८

⭐ श्राद्धतिथी -  चतुर्दशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५९ ते स.११:५८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. (panchang)

**या दिवशी मध खावू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १०:५८ ते १२:२१ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:२१ ते १३:४४💰💵

👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५६

पृथ्वीवर अग्निवास ०६:५५ प.🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

हेही वाचा: Panchang 21 November : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस शुभ जाईल

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - कार्तिक

पक्ष - कृष्ण

तिथी - त्रयोदशी(०६:५५ प.नं.चतुर्दशी)

वार - मंगळवार

नक्षत्र - स्वाती(२२:४७ प.नं.विशाखा)

योग - सौभाग्य(१८:४९ प.नं.अनुराधा)

करण - वणिज(०६:५५ प.नं.भद्रा)

चंद्र रास - तुळ

सूर्य रास - वृश्चिक

गुरु रास - मीन

हेही वाचा: Panchang 21 November : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस शुभ जाईल

विशेष:- भद्रा ०६:५५ ते १८:२४, शिवरात्रि , श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन, श्री दासगणू महाराज पु.ति

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 अंगारक कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणेशास गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

👉 दिशाशूल * उत्तर* दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह,तुळ, धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

टॅग्स :Panchang