Today's Panchang 23 जुलै 2022 : निळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०५ ते दु.०१:५९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang in MarathiSakal
Updated on

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २३ जुलै २०२२ (daily panchang 23 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण १ शके १९४४

सूर्योदय - ६:११ तर सूर्यास्त -१९:०९ वाजता होणार तर चंद्रोदय -२६:१८ वेळी तर प्रात: संध्या स.०५:०४ ते स.०६:११ होणार. सायं संध्या १९:०९ ते २०:१५ दरम्यान होणार तर अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३४ दरम्यान होणार. आज प्रदोषकाळ हा १९:०९ ते २१:२१ दरम्यान असणार तर निशीथ काळ २४:१८ ते २५:०२ दरम्यान असणार. आज राहु काळ ०९:२७ ते ११:०४ दरम्यान असणार तर यमघंट काळ १४:१८ ते १५:५५ दरम्यान असणार. आज श्राद्धतिथी ही एकादशी श्राद्ध असणार.

सर्व कामांसाठी दु ०१:१६ नं.शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०५ ते दु.०१:५९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे या दिवशी पडवळ खावू नये. तसेच या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Shravan 2022: श्रावण महिन्यात 'या' चार गोष्टी स्वप्नात दिसणे मानले जाते शुभ, जाणून घ्या संकेत

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १४:१८ ते १५:५५

  • अमृत मुहूर्त - १५:५५ ते १७:३२

  • विजय मुहूर्त - १४:५१ ते १५:४२

पृथ्वीवर अग्निवास नाही तर राहु मुखात आहुती आहे. शिववास १३:१५ नं. कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी १३:१५ नं. अनुकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - दशमी(१३:१५ प.नं.एकादशी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - कृत्तिका(२१:२५ प.नं.रोहिणी)

  • योग - गंड(१६:२५ प.नं.वृद्धि)

  • करण - भद्रा(१३:१५ प.नं. बव)

  • चंद्र रास - वृषभ

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मीन

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Nag Panchami 2022: नागपंचमीच्या दिवशी चुकूनही 'या' पाच गोष्टी करू नका.

विशेष:- भद्रा १३:१५ प ., सर्वार्थामृतसिद्धियोग २१:२५ नं.

या दिवशी पाण्यात दारूहळद वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. हनुमानास खजुराचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Shravan 2022 : राजगिऱ्याच्या पीठाचा पौष्टिक शिरा कसा तयार करायचा ?

चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक,धनु, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com