Today's Panchang 26 जुलै 2022 : लाल वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल |Aajache Panchang | Daily Panchang in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi

Today's Panchang 26 जुलै 2022 : लाल वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २६ जुलै २०२२ (daily panchang 26 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ४ शके १९४४

आज सूर्योदय ०६:१२ तर सूर्यास्त १९:०८ होणार. आज चंद्रोदय २८:४२ वाजता तर प्रात: संध्या स.०५:०५ ते स.०६:१२ दरम्यान असणार. आज सायं संध्या १९:०८ ते २०:१४ दरम्यान असणार. आज अपराण्हकाळ १३:५९ ते १६:३४ दरम्यान असणार तर प्रदोषकाळ १९:०८ ते २१:२० दरम्यान असणार. आज निशीथ काळ २४:१८ ते २५:०२ दरम्यान असणार. आज राहु काळ १५:५५ ते १७:३१ तर यमघंट काळ ०९:२७ ते ११:०४ दरम्यान असणार. आज श्राद्धतिथी ही त्रयोदशी श्राद्ध आहे.

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५८ ते दु.०३:४२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे या दिवशी वांगी खावू नये या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

हेही वाचा: Panchang 25th july : या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ११:०४ ते १२:४१

  • अमृत मुहूर्त-- १२:४१ ते १४:१८

  • विजय मुहूर्त— १४:५२ ते १५:४२

आज पृथ्वीवर अग्निवास १८:०८ प. तर केतु मुखात आहुती आहे. शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - त्रयोदशी(१८:०८ प.नं.चतुर्दशी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - आर्द्रा(२८:२७ प.नं.पुनर्वसू)

  • योग - व्याघात(१७:३१ प.नं.हर्षण)

  • करण - वणिज(१८:०८ प.नं. भद्रा)

  • चंद्र रास - मिथुन

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मीन

हेही वाचा: सदर ः संस्कृती

विशेष:- भद्रा १८:०८ नं., शिवरात्रि, संत नामदेव महाराज पु.ति, संत जनाबाई पुण्यतिथी, यमघंट योग २८:२७ प.

या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे. गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. गणपतीस गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे. दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गुळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, सिंह, कन्या,धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

Web Title: Daily Panchang 26 July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanskrutiPanchang