Today's Panchang 27 जुलै 2022 : हिरवे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल | Aajache Panchang | Daily Panchang in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi

Today's Panchang 27 जुलै 2022 : हिरवे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग २७ जुलै २०२२

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २७ जुलै २०२२ (daily panchang 27 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण ५ शके १९४४

आज सूर्योदय ०६:१२ वाजता तर सूर्यास्त १९:०७ वाजता होणार. चंद्रोदयची वेळ २९:३५ तर प्रात: संध्या स.०५:०५ ते स.०६:१२ दरम्यान असणार. सायं संध्या १९:०७ ते २०:१३ दरम्यान असणार तर अपराण्हकाळ १३:५९ ते १६:३४ दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ १९:०८ ते २१:२० दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:१८ ते २५:०२ दरम्यान असणार. आज राहु काळ हा १२:४१ ते १४:१८ दरम्यान आहे तर यमघंट काळ हा ०७:५१ ते ०९:२८ दरम्यान आहे. आज श्राद्धतिथी ही चतुर्दशी श्राद्ध आहे तर सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३२ ते दु.१२:१५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. विशेष म्हणजे या दिवशी मध खावू नये. तर या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

हेही वाचा: Nag Panchami 2022 : आजच्या काळात नागपंचमी साजरी करतांना कोणती विशेष काळजी घ्यावी ?

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १७:३१ ते १९:०८

  • अमृत मुहूर्त - ७:५१ ते ०९:२८

  • विजय मुहूर्त - १४:५२ ते १५:४२

आज पृथ्वीवर अग्निवास २०:०८ नं. तर केतु मुखात आहुती आहे. शिववास २०:०८ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी २०:०८ नं.शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - चतुर्दशी(२०:०८ प.नं.अमावास्या)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - पुनर्वसू(अहोरात्र)

  • योग - हर्षण(१८:११ प.नं.वज्र)

  • करण - भद्रा(०७:०८ प.नं. शकुनि)

  • चंद्र रास - मिथुन(२४:२४ नं.कर्क)

  • सूर्य रास - कर्क

  • गुरु रास - मीन

हेही वाचा: Shravan Somvar 2022: उपवासाच्या दिवशी बनवा साबुदाणा डोसा

विशेष:- भद्रा ०७:०८ प., संत सावतामाळी पु.ति

या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. विष्णूंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे. दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- वृषभ, मिथुन, सिंह, कन्या,धनु, मकर या राशिंना रा.१२:२४ प.चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Web Title: Daily Panchang 27 July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanskrutiPanchang