
Nag Panchami 2022 : आजच्या काळात नागपंचमी साजरी करतांना कोणती विशेष काळजी घ्यावी ?
यंदा 2 ऑगस्टला शिव आणि सिद्धी अशा दोन्ही योगात नागपंचमी साजरी होणार आहे.
चला तर मग आता बघू या आजच्या काळात नागपंचमी साजरी करतांना आपण सर्वांनी कोणती विशेष काळजी घ्यावी ?
● नागपंचमीच्या दिवशी खर्या सापाची किंवा नागाची पूजा करू नये, प्रतिकात्मक स्वरुपात चित्राची किंवा शिल्पाची पूजा करावी.
● भारताच्या वाइल्ड लाइफ प्रोटेक्षन कायद्यानुसार सापांना पकडणे, पकडून ठेवणे, वापरणे, त्यांना त्रास देणे किंवा मारणे हा गुन्हा आहे.
● सापांना बऱ्याच ठिकाणी पिशवीत श्वास कोंडून पकडले जाते. लहानशा बरणीतमध्ये जिथे त्यांना अंग मोकळेही करता येत नाही अश्या ठिकाणी ठेवले जाते व उपासमार केली जाते. त्यांचे दात दुष्टपणे तोडले जातात, गारूडीलोक त्यांची तोंडे शिवून टाकतात. ज्याने नागांना अति वेदना होतात. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या लोकांपासुन आपण दुर राहावे.
हेही वाचा: Nag Panchami 2022 : तुम्हाला नागपंचमीची कहाणी माहिती का ?
● नागपंचमीच्या दिवशी जिवंत सापाला दूध पाजणे टाळावे कारण दूध हे सापाचे अन्न नाही. त्यामुळे त्यांना डिहायड्रेशन होते. डिसेंट्री होऊन मृत्यू पण ओढवू शकतो.
● नागपंचमीला जिवंत सापाची पूजा करुच नये.कारण पूजेत वापरले जाणाऱ्या कुंकू जर का सापांच्या डोळ्यात गेल्याने साप आंधळा होतो. कारण शेवटी ते कुंकू एक केमिकलच आहे.
● गारुडी जो सापाचा पुंगीवर नाच दाखवतो तो नाच नसून , गारुड्याच्या अॅक्क्षनची भीती वाटल्याने सापाने केलेल्या हालचाली असतात. वास्तविक पाहिले तर साप नाचत नाही. त्यांना गारुडी हे थ्रेटनिंग वाटतात.
हेही वाचा: Nag Panchami 2022: नागपंचमीच्या दिवशी चुकूनही 'या' पाच गोष्टी करू नका.
● जर का तुम्ही सापाच घर असलेल्या वारुळाची पूजा करणार असाल तर त्या वारुळावर भसाभसा दूध किंवा पाणी टाकू नका, वारुळावर दिवा,अगरबत्ती किंवा धूप लावू नका.
● नागपंचमीच्या दिवशी जवळच्या एखाद्या सर्पमित्रांला बोलवून सापांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.त्यामुळे तुमच्या मनात सापाविषयीचे गोडगैरसमज दुर होण्यास मदत होईल. आणि सापांविषयी खरी माहिती तुम्हाला कळेल.
● नागपंचमीला खूप गावात पत्ताचे डाव बसवले जातात .आणि एकदा तुम्ही त्या डावात बसले तर तुमचे प्रचंड पैसे त्या डावावर लागु शकतात. त्यामुळे अशा गोष्टीपासून दुर राहावे.
● नागपंचमीविषयी या काही सकारात्मक गोष्टी नव्याने शिकणे काळाची गरज झाली आहे.
Web Title: What Special Precautions Should Be Taken While Celebrating Nag Panchami
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..