
Panchang 3rd august : या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे
सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग ३ ॲागस्ट २०२२
पंचांगकर्ते : ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ३ ॲागस्ट २०२२
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक श्रावण १२ शके १९४४
सूर्योदय ०६:१५ वाजता आणि सूर्यास्त - १९ : ०५ वाजता होईल. चंद्रोदय १०:४५ वाजता, प्रात: संध्या स.०५:०८ ते स.०६:१५ या वेळेत, सायं संध्या - १९:०५ ते २०:१२ या वेळेत होईल. अपराण्हकाळ १३:५८ ते १६:३२, प्रदोषकाळ १९:०५ ते २१:२०, निशीथ काळ २४:१९ ते २५:०३, राहु काळ १२:४१ ते १४:१७, यमघंट काळ ०७:५३ ते ०९:२्, श्राद्धतिथी षष्ठी श्राद्ध असेल.
सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३३ ते दु.१२:१५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी तेल खाऊ नये. या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
लाभदायक
लाभ मुहूर्त - १७:२९ ते १९:०५
अमृत मुहूर्त - ०७:५३ ते ०९:२९
विजय मुहूर्त - १४:५० ते १५:४३
पृथ्वीवर अग्निवास दिवसभरबुध मुखात आहुती आहे.शिववास नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी अनुकूल दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्अयन
दक्षिणायन ऋतु - वर्षा(सौर)
मास - श्रावण पक्ष
शुक्ल तिथी - षष्ठी (२५:३३ प.नं.सप्तमी)
वार - बुधवार
नक्षत्र - हस्त (१५:४९ प.नं.चित्रा)
योग - सिद्ध (१६:२० प.नं.साध्य)
करण - कौलव (१३:५१ प.नं. तैतिल)
चंद्र रास - कन्या (२७:४९ नं.तुळ)
सूर्य रास - कर्क
गुरु रास - मीन
विशेष :-
सूर्याचा आश्लेषा नक्षत्र प्रवेश २३:४२, मूषक वाहन; सामान्यवृष्टियोग, बुधबृहस्पती पूजन, ऋक् श्रावणी, कल्किजयंती, श्रियाळ-वर्णषष्ठी, कार्तिकेयास कापसाचे पोवते वाहणे, रवियोग-सर्वार्थसिद्धियोग १५:४९ प.
या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे. ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. विष्णूंना पिस्त्याचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.
दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ :- मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशिंना रात्री.०३:४९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.
©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)
Web Title: Daily Panchang In Marathi 3rd
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..